लासुर स्टेशन येथे शिवना पब्लीक स्कूलच्या वतीने आषाढी एकादशी निमित्ताने दिंडी

*लासुर स्टेशन येथे शिवना पब्लीक स्कूलच्या वतीने आषाढी एकादशी निमित्ताने दिंडी*

गंगापूर (प्रतिनिधी)
लासुर स्टेशन येथील शिवना पब्लिक स्कूलच्या वतीने आषाढी एकादशी निमित्ताने लासुरगाव येथील देवी दक्षायणी मंदिरामध्ये विद्यार्थ्यांनी गुरुवारी वारकरी संप्रदायाच्या वेशभूषेमध्ये दिंडी काढली.यावेळी विठ्ठल नामाची शाळा भरली विविध वारकरी संप्रदायाचा वेशभूषा करून भगवा पताका हातात घेतला.लासूरगांव येथील देवी दाक्षायणी मंदीरात विद्यार्थ्यांनी पावल्या भजन म्हणत उपस्थितांची मने जिंकली यावेळी शाळेचे संचालक विशाल गायकवाड,वर्षा गाकवाड ,प्राचार्या संध्या तांबट , मोनिका कोचर,
रेणुका हरकळ,पुजा तुपे, प्रीती केरे, वैष्णवी गवळी, दिपाली चव्हाण, वैष्णवी वाघचौरे,पुजा नाडे,सचिन वाघचौरे,भारत खाजेकर,कुणाल काकडे आदींनी परिश्रम घेतले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!