आयोध्या येथून अतुल रासकर यांना आली श्रीराम प्रभूची पितळी मूर्ती भेट. गृहमंत्री तथा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे पत्रे आले


गंगापूर (प्रतिनिधी) गंगापूर उपजिल्हा रुग्णालयचे रुग्ण कल्याण समिती सदस्य अतुल रासकर यांना थेट आयोध्यातून श्रीराम प्रभूंची पितळी मूर्ती भेट आली असून गृहमंत्री तथा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांचे स्फूर्तीदायी पत्रही आले असून त्यात या प्रभू श्रीरामाच्या पितळी मूर्ती विषयी इतभूंत माहिती दिली असून , ही प्रभू श्रीरामाची मूर्ती दंडाधारी असून तब्बल ५०० वर्षानंतर आयोध्यात रामलल्ला विराजमान होणार असून त्या प्रीत्यार्थ अनुलोम संस्थेमार्फत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांच्यातर्फे ही मूर्ती देण्यात आली आहे. अतुल रासकर यांचे गंगापूर खुलताबादचे आमदार प्रशांत बंब, अनुलोम संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी स्वानंद ओक‌ सहमुख्याअधिकारी सुजाता नवपुते भाजपचे तालुका अध्यक्ष रवींद्र चव्हाण, युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष अमोल पाटील जाधव, कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती भाऊसाहेब पाटील पदार, आमदार प्रशांत बंब यांचे स्वीय सहाय्यक कृष्णकांत व्यवहारे, गोपाल वर्मा,अनुलोमचे श्रीकांत नवपुते, वकील संदीप तारू, वकील अमोल रासकर, प्रशांत मुळे, अमोल शिंदे, दिनेश राऊत ,अजय रासकर, निलेश डुकरे, रवी कुमावत, तेजस सोनवणे, संभाजी दांरुटे आदींसह मित्र परिवाराने अभिनंदन केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!