ज्या ज्या घरामध्ये भजन आणि भोजन एकत्रित होतात ते घर नाही भगवंताचे मंदिर आहे. : रामराव महाराज ढोक. संतोष ज्वेलर्सचे गोविंदराव वामनराव अंबिलवादे यांचा ७५ वा अमृत महोत्सवी दिमाखदार अभिष्टचिंतन सोहळा लाडुतुला करुन संपन्न

संतोष ज्वेलर्सचे गोविंदराव वामनराव अंबिलवादे यांचा ७५ वा अमृत महोत्सवी दिमाखदार अभिष्टचिंतन सोहळा लाडुतुला करुन संपन्न

गंगापुर (प्रतिनीधी) जगात सर्वात श्रेष्ठ आई वडील आहेत,पैशाने सर्व काही मिळेल आई वडील मिळणार नाहीं,जिवंत पणी आई वडिलांना सांभाळा.मुले जेव्हा जेव्हा एकत्र राहतात तेव्हा आई वडिलांचे आयुष्य वाढते धन टिकण्याचा एक मंत्र आहे मोठा भाऊ लहान भाऊ एकत्र राहीले पाहीजे.ज्या ज्या घरामध्ये भजन आणि भोजन एकत्रित होतात ते घर नाही भगवंताचे मंदिर आहे.सज्जनाला आयुष्य कमी व दुर्जनाला अधिक ही परंपरा पूर्वापार चालत आली असून सज्जनांच्या आयुष्यातील सुखाचे क्षण वाढवण्यासाठी अभिष्टचिंतन सोहळ्याची कलीयुगात नितांत गरज आहे.
अंबिलवादे परिवाराने वडिलांचा वाढदिवस ऐश्वर्याला शोभेल असा केला आहे हा आदर्श सर्वांनी घेतला पाहिजे असे प्रतिपादन हरिभक्त परायण रामायणाचार्य रामरावजी महाराज ढोक यांनी श्री.गोविंदराव वामनराव अंबिलवादे यांचा ७५ वा अभिष्टचिंतन सोहळ्यानिमित्त रविवार २२ ऑक्टोंबर रोजी आयोजित कार्यक्रमात केले.

किर्तन झाल्यावर परिवार नातेवाईक व सर्व मित्रमंडळाच्या वतीने गोविंदराव वामनराव अंबिलवादे यांची लाडुतुला करण्यात आली.लाडुतुला नंतर शुभेच्छा देण्यासाठी आमदार सतीश चव्हाण,माजी आमदार कैलास पाटील,माजी नगराध्यक्ष संजय जाधव, राष्ट्रवादी महिला सरचिटणीस सुवर्णाताई जाधव,पैठणचे माजी नगराध्यक्ष सुरज लोळगे,माजी नगराध्यक्ष मोसीन चाऊस,जिल्हापरिषद सदस्य मधुकर वालतुरे, माजी उपनगराध्यक्ष रावसाहेब तोगे,
माजी नगरसेवक अविनाश पाटील, सुरेश नेमाडे, योगेश पाटील, भाग्येश गंगवाल,माजी नगरसेवक संदेश गंगवाल,व्यापारी महासंघाचे अध्यक्ष महेंद्र गुंदेजा,समाजसेवक अमोल जगताप,वाल्मीक शिरसाठ,राहुल वानखेडे,अंकुश सूंब,राकेश कळसकर,विजय वरकड,बाबासाहेब गायके,तुकाराम सटाले,आशिष शहाने सह राजकीय क्षेत्रातील मान्यवर,व्यापारी डॉक्टर,विधी तज्ञ परिवारातील संतोष अंबिलवादे,सुनील अंबिलवादे,धनंजय टाक,अतुल सोनार,अनिकेत सोनार,पांडुरंग बागडे,आकाश बागडे,
प्रथमेश सोनार,वैभव टाक,संगीता अंबिलवादे,वैशाली अंबिलवादे आदींसह मित्र परिवार उपस्थित होता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!