सार्वजनिक दुर्गा नवरात्र उत्सव समिती, गंगापूर यांच्या वतीने रक्तदान शिबीरात तीस रक्तदात्यांनी रक्तदान केले.


गंगापूर (प्रतिनिधी) येथील जिल्हा परिषद प्रशालेच्या मैदानावर सार्वजनिक दुर्गा नवरात्र उत्सव समितीच्या वतीने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून सार्वजनिक दुर्गा नवरात्र उत्सव समिती, गंगापूर व औरंगाबाद ब्लड बँक यांच्या संयुक्त विद्यमाने सोमवार, २३ ऑक्टोबर रोजी रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबीराचे उदृघाटन माजी नगराध्यक्ष संजय जाधव व सुवर्णाताई संजय जाधव यांच्या हस्ते करण्यात आले. रक्तदान शिबीरात ३० रक्तदात्यांनी रक्तदान केले.
यावेळी माजी उपनगराध्यक्ष रावसाहेब तोगे, सोपान देशमुख, गोरख इंगळे,, मंगेश देशमुख , रेखा राजपूत, कावेरी पाहुणे, तारा पदार, शितल नावंदर, यांची प्रमुख उपस्थिती होती. हे रक्तदान शिबीर यशस्वी करण्यासाठी शरद दारुंटे, बाळू जाधव, अमोल बुरकुल, आकाश मोरे, अर्जुन कराळे, ऋषिकेश जोगदंड, ओंकार जाधव यांनी विशेष परिश्रम घेतले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!