जिजाऊ महिला फाऊंडेशन आयोजित व संतोष ज्वेलर्स प्रस्तुत गौरी सजावट स्पर्धेचा निकाल जाहीरप्रथम क्रमांक उषाबाई रमेश कुरणे यांनी पटकावला.


गंगापूर (प्रतिनिधी) गंगापूर तालुक्यातील महिलांसाठी जिजाऊ महिला फाउंडेशन व संतोष ज्वेलर्स यांच्या संयुक्त वतीने भव्य गौरी सजावट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते ,
यातील विजयी स्पर्धकांना सार्वजनिक दुर्गामाता उत्सव समितीच्या कार्यक्रमात विजयी स्पर्धकांना बक्षीस वितरण करण्यात आले.
या स्पर्धेतील विजेत्यांना संतोष ज्वेलर्स (मांजरीकर) यांच्या तर्फे
प्रथम पारितोषिक उषाबाई रमेश कुरणे यांना २ ग्रॅम सोन्याची अंगठी ,द्वितीय पारितोषिक कांचन महेश मुंदडा १ ग्रॅम सोन्याची नथ, तृतिय पारितोषिक काजल शिवप्रसाद बन्सोड , शिल्पा संतोष जाधव व संगीता खोचे यांना प्रत्येकी १ पैठणी, चतुर्थ पारितोषिक कल्पना पाठे, सुष्टी लोखंडे, भारती ठाकूर, सुनिता खंडागळे, निर्मला दंडगवाळ यांना आकर्षक पाच साडी तसेच सहभागी स्पर्धकांना आकर्षक उत्तेजनार्थ बक्षिस देण्यात आले . यावेळी संतोष ज्वेलर्स (मांजरीकर) चे व्यवस्थापक संतोष अंबिलवादे जिजाऊ फाऊंडेशन अध्यक्षा तथा राष्ट्रवादीच्या महीला सरचिटणीस सुवर्णाताई जाधव , अर्चनाताई कदम , कावेरीताई पाहुणे ,अश्विनीताई नेमाडे
, संगिताताई खोचे , रेखाताई राजपूत , ताराताई पदार , संगिताताई वाघ , सविताताई साळुंके , शितलताई नावंदर ,सुनिताताई सोळके , संगीताताई अंबिलवादे ,वैशालीताई अंबिलवादे आदींसह महीला व नागरीक मोठ्या संख्येने उपस्थित होते

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!