लामनगाव जिल्हा परिषद शाळेच्या निकृष्ट बांधकामाच्या विरोधात मनसे आक्रमक


छत्रपती संभाजीनगर (प्रतिनिधी) खुलताबाद तालुक्यात लामनगाव येथे जिल्हा परिषद शाळा खोल्यांचे निकृष्ट दर्जाचे बांधकाम थांबवून ठरवुन दिल्या (एमबी)प्रमाणे काम करावे नसता तीव्र आंदोलन करण्याचा इशारा मनसेने दिला आहे.


शाळेच्या बांधकामाकडे प्रशासनाचे कुठलेही लक्ष नाही. गावकऱ्यांच्या तक्रारीवरून मनसे ने या शाळेची पाहणी केली असता दोनच व्यक्ती बिगारी व मिस्री काम करत असल्याचे आढळल्याने तेथे कोणताही तांत्रिक कर्मचारी उपस्थित नसल्याचे निदर्शनास आले आहे. संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यासाठी मनसे ने आक्रमक भूमिका घेतली असून तीव्र आंदोलन करण्याचा इशारा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या रस्ते, साधन-सुविधा व अस्थापना विभागाचे जिल्हा संघटक अशोक पवार पाटील यांनी प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनात दिला आहे.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या रस्ते, साधन-सुविधा व अस्थापना विभागाचे जिल्हा संघटक अशोक पवार पाटील यांनी प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनात म्हटले आहे कि, खुलताबाद तालुक्यात असलेल्या लामनगाव येथील जिल्हा परिषदेच्या शाळेचे अत्यंत निकृष्ट दर्जाचे काम करण्यात येत असल्याचे निदर्शनास आले आहे. या ठिकाणी बांधकामाचे साहित्य सिमेंट, वाळू, डष्ट, याचे कोणतेही मोजमाप न करता मोठ मोठे डेपो टाकून यात अर्धी गोणी सिमेंट चा वापर करण्यात येत आहे. साईट वर बांधकामाचा नकाशा नाही. व कोणताही तांत्रिक कर्मचारी / अधिकारी साईट वर उपस्थित राहत नाहीत. बांधकाम केलेल्या कामाच्या विटा या हाताने निघत असून कॉलम व बीम यांना किती स्टील वापरायचे याचा नकाशाही या साईट वर नाही. फाऊंडेशनचे बीम अत्यंत निकृष्ट दर्जाचे भरले आहे. जे पायानेही उकरले असता हे बीम उघडे पडत असून यात कोणतेही स्टील आढळून आले नाही. बांधकामास वापरलेले सिमेंट, वाळू, डष्ट याची गुणवत्ता इतकी वाईट आहे ते नुसत्या राखे प्रमाणे दिसते. तसेच कॉलम भरण्या अगोदर वीट बांधकाम सुरु आहे कॉलम, बीम भरल्या नंतर कामाची गुणवत्ता केली असे वाटत नाही. या कामाची चौकशी करून संबंधितांवर कारवाई करण्यात येवून एमबी प्रमाणे काम करावे नसता मनसेच्या वतीने तीव्र आंदोलन करण्याचा इशारा निवेदनात दिला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!