वीज पडून मृत्यूमुखी पडलेल्या बैलाची नुकसान भरपाई शेतकऱ्याला सुपूर्द …मशागती पूर्वी भरपाई मिळाल्याने शेतकरी समाधानी….

वीज पडून मृत्यूमुखी पडलेल्या बैलाची नुकसान भरपाई शेतकऱ्याला सुपूर्द
मशागती पूर्वी भरपाई मिळाल्याने शेतकरी समाधानी .
गंगापूर (प्रतिनिधी) तालुक्यातील सिद्धनाथ वाडगाव येथील शेतकरी किशोर वाघ यांच्या शेताजवळ दीड महिन्यापूर्वी अवकाळी पावसात बैलावर वीज पडून बैल दगावून शेतकऱ्याचे नुकसान झाले होते शेतकऱ्याला नैसर्गिक आपत्तीचे मदत मिळवण्यासाठी पंचनामा करून मदत मिळण्यासाठी ग्रामपंचायत च्या वतीने तहसीलदार गंगापूर यांच्या कडे पाठपुरावा केला होता एक महिन्यातच शेतकरी किशोर चव्हाण यांना गुरुवार दिनांक 22 जून रोजी बत्तीस हजार रुपयांचा मदतीचा धनादेश तलाठी जानी शेख, सरपंच लीलाबाई खंडागळे, उपसरपंच प्रमोद महाजन, जिवन बैनाडे,भगवान वाघ सुपूर्द करण्यात आला तसेच ग्रामपंचायत सदस्य संतोष चव्हाण, अमोल चव्हाण, प्रमोद भालेराव, मच्छिन्द्र वाघ,नितीन वाघ, योगेश वाघ आदींनी आभार व्यक्त केले शेतीची कामे सुरु होण्या अगोदर मदत मिळाली म्हणून आपत्ती ग्रस्त शेतकरी किशोर चव्हाण यांनी समाधान व्यक्त करून आभार मानले आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!