काळीमा फासणारी घटना…बावीस वर्षीय महिलेवर तिन नराधम भावांनी केला बलात्कार

काळीमा फासणारी घटना..
बावीस वर्षीय महिलेवर तिन नराधम भावांनी केला बलात्कार
पैठण (प्रतिनिधी) सरपण आणण्यासाठी शेतात गेलेल्या बावीस वर्षीय युवतीवर तिन सख्या भांवानी सामुहिक बलात्कार केला ही किळसवाणी व काळीमा फासणारी घटना छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील पैठण तालुक्यातील पांरुडी येथे २० जुन रोजी दुपारी चारच्या सुमारास घडली.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार पैठण तालुक्यातील पारुंडी शिवारातील शेत गट क्रमांक ७३ मधील स्वतःच्या मोसंबीच्या झाडाच्या शेतातील बांधावर फिर्यादी २० जुन रोजी दुपारी चारच्या सुमारास सरपण आणण्यासाठी गेली असता आरोपी नितीन बाबासाहेब निसर्ग , संजय बाबासाहेब निसर्ग , विजय बाबासाहेब निसर्ग सर्व रा. पारुंडी तालुका पैठण यांनी फिर्यादीला एकटी पाहून त्याच्या जवळ येऊन आरोपी संजयने फिर्यादीचा हात धरून तिला खाली पाडले व तिचा चेहरा दाबला व फिर्यादीची साडी काढली व आरोपी नितीन व विजय यांनी एकामागोमाग बलात्कार केला व धमकी दिली तू आमचे नाव तुझ्या पतीला सांगितले तर तुझा नव-याला जीवे मारुन टाकीन व तुला जिवंत सोडणार नाही अशी धमकी दिली या धमकी मुळे फिर्यादीने २२ जुन रोजी रात्री उशिरा वरील आरोपी विरोधात भादवी कलम ३७६(डी), ५०६,३४ प्रमाणे पाचोड पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून सर्व आरोपी फरार असून सपोनी श्रीमती सांगळे ह्या पुढील तपास करीत आहेत या घटनेमुळे परिसरात संताप व्यक्त करण्यात येत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!