गंगापूर तहसील आवारातुन अवैध वाळूच्या तिन हायवा पळविणाऱ्या अज्ञात चोरट्यांच्या विरोधात गुन्हा दाखल


गंगापूर (प्रतिनिधी) उपविभागीय अधिकारी डॉ अरुण ज-हाड यांनी अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या ९ हायवा पकडून तहसील कार्यालयाच्या आवारात ठेवल्या असता अज्ञात चोरांनी तीन हायवा रात्री दहा ते अकरा वाजे दरम्यान पळून नेल्या प्रकरणी गंगापूर पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार अज्ञात चोरट्यांनी तीन हायवा तहसील कार्यालयाच्या आवारातुन ८ नोव्हेंबर रोजी रात्री साडे दहा ते अकरा वाजता अज्ञात चोरट्यांनी अवैध वाळूची वाहतूक करणारे तीन हायवा अंदाजे किंमत पंधरा लाख रुपये किंमतीचे अज्ञात चोरट्यांनी पळवुन नेल्या प्रकरणी मंडळ अधिकारी राजु बेडवाळ यांच्या फिर्यादीवरून ९ नोव्हेंबर रोजी पोलीस ठाणे गंगापुर येथे फिर्याद दिली दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की उपविभागीय अधिकारी वैजापुर डॉ अरुण ज-हाड यांनी अवैध गौण खनिज उत्तखन्न करताना ८ हायवा जप्त करून गंगापूर येथील तहशील कार्यालयाच्या आवारात लावण्यात आले होते. या वाहनावर दंडात्मक कार्यावाही करुन दंडवसुल करण्याची कार्यवाही सुरु असताना जप्त केलेली वाहने ८ नोव्हेंबर रोजी रात्री अंदाजे पवणेआकरा ते आकरा वाजेच्या दरम्यान वाहनाचे चालक मालक नाव गाव माहित नाही. व ईतर अज्ञात व्यक्ती ने तहसील कार्यालयाच्या आवारातुन लबाडीच्या ईराद्याने बिगर नंबरचे हायवा १) हायवा चेस्सिस क्रं MAT 47182k361890, २) हायवा चेस्सिस के MAT 448856L3A00588 ,
३) हायवा चेस्सिस क्रं MAT 797025N3F17105 वरील वाहनाचे चालक व मालक यांनी व ईतर अद्यात व्यक्तीने सदर वाहनावर दंडात्मक कार्यवाही करुन दंड वसुल करण्याची कार्यवाही सुरु असतांना वाहन पळवुन घेवुन गेल्या प्रकरणी अज्ञात चोरट्यांच्या विरोधात भादवी कलम ३७९ प्रमाने गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस करत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!