गावठी कट्टा व जीवंत काडतुसासह तीनं दरोडेखोरांच्या गंगापूर पोलिसांनी आवळल्या मुसक्या

गावठी कट्टा व जीवंत काडतुसासह तीनं दरोडेखोरांच्या गंगापूर पोलिसांनी आवळल्या मुसक्या

गंगापूर (प्रतिनिधी) पडक्या हाॅटेलमध्ये लपवुन बसलेले मागील रोडराॅबरी गुन्ह्यातील तीन आरोपींना पकडून त्यांच्या ताब्यातुन गावठी कट्टा एक जीवंत काडतुस व दोन बॅट-या असा मुद्देमाल गंगापूर पोलिसांनी जप्त केला.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार गंगापूर पोलिसांना मिळालेल्या माहितीनुसार संशयित चोर गंगापूर लासुररोडवरील बंद हंसराज हाॅटलमध्ये लपलेले आहे यावरून गंगापूर पोलिसांनी बंद हाॅटेलवर धाड टाकली असता चोरट्यांनी पडक्या खोलीच्या बाहेर उडया मारून अंधारात शेतातील रस्त्याने सुसाट पळ काढला यावेळी पोलीसांनी त्यांचा अंधारात पाठलाग सुरू केला अंधाराचा फायदा घेवुन पळुन जाण्याच्या प्रयत्नात असतांना पोलीसांनी अनिल गोपीनाथ होन, वय २१ वर्ष, रा. सिध्दपूर, ता. गंगापूर, जिल्हा छत्रपती संभाजीनगर, कैलास दत्तात्र्य गव्हाणे, वय २४ वर्ष, रा. मंगळापुर, ता. नेवासा, जि.अ.नगर, आकाश संपत जाधव, वय २३ वर्ष रा. सिध्दपूर, ता. गंगापूर, जिल्हा छत्रपती संभाजीनगर यांना पकडले. त्यांना बंद हॉटेल मध्ये संशयीत रित्या थांबल्याबाबत विचारपुस करता ते पोलीसांना उडवा उडवीचे उत्तरे देवु लागल्याने त्यांच्यावर अधिक संशय बळावल्याने त्यांना विश्वासात घेवून पंचासमक्ष त्यांची अंगझडती घेतली असता यातील संशयीत अनिल गोपीनाथ होन, वय १९ वर्ष, रा. सिध्दपूर, याच्या कमरेला एक गावठी कट्टा व एक जिवंत काडतूस मिळुन आला यावरुन त्यांची कसोशिने चौकशी केली असता यापूर्वी १३ ऑगस्ट २३ रोजी मध्यरात्री वैजापुर ते गंगापुर रोडवर आशिर्वाद पेट्रोल पंपासमोर शस्त्राचा धाक दाखवून एका ट्रक चालकाजवळील रोख रक्कम व ट्रकच्या दोन बॅटरी असा माल जबरीने चोरुन नेला होता. याबाबत दाखल गुन्हयात ते पोलीसांना हवे होते तेव्हा पासुन ते स्वतःचे अस्तिव लपवुन पोलीसांना गुंगारा देत लपत होते.त्यांच्या ताब्यातून एक गावढी कट्टा ( पिस्टल), एक जिवंत काडतूस, दोन ट्रकच्या बॅटरी, असा एकूण ४०,०००/- रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून वरील गुन्हयात त्यांना अटक करण्यात आली ही कारवाई पोलीस अधीक्षक मनिष कलवानिया, अप्पर पोलीस अधीक्षक सुनिल लांजेवार, उपविभागीय पोलीस अधिकारी प्रकाश बेले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक सत्यजीत ताईतवाले, सपोनी भागवत नागरगोजे, पोहेका अमोल कांबळे, अभिजीत डहाळे, तेनसिंग राठोड, राहुल वडमारे, विजय नागरे, मनोज नवले यांनी केली आहे पुढील तपास पोलीस करीत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!