आमदार प्रशांत बंब,मुंदडा परिवार व सप्ताह समितीने आपल्या धर्माचे,सांस्कृतिचे वैभव वाढविले..श्री क्षेत्र देवगड संस्थानचे मठाधिपती भास्करगिरी महाराज

आमदार प्रशांत बंब,मुंदडा परिवार व सप्ताह समितीने आपल्या धर्माचे,सांस्कृतिचे वैभव वाढविले..श्री क्षेत्र देवगड संस्थानचे मठाधिपती भास्करगिरी महाराज

गंगापूर (प्रतिनिधी)तालुक्यातील अमळनेर येथे मंगळवारी २९ ऑगस्ट ते मंगळवारी ५ सप्टेंबर दरम्यान चाललेल्या शताब्दी अखंड हरिनाम सप्ताह तथा वैकुंठवासी ह.भ.प कन्हैयालालजी मुंदडा महाराज यांच्या १४ वे पुण्यस्मरण निमित्ताने गोवत्स भागवताचार्य श्री राधाकृष्णाजी महाराज यांच्या मुखविंदातून श्रीमत भागवत कथा ज्ञानयज्ञ व नामसंकीर्तन सोहळ्याची मंगळवारी ५ सप्टेंबर रोजी हभप समाधान महाराज शर्मा यांच्या काल्याच्या किर्तनाने उत्साहात सांगता झाली.

या धार्मिक सोहळ्याला हजारो भाविक या ठिकाणी सहभागी झाले होते ,त्यांच्या मोठ्या उपस्थितीने परिसर गर्दीने फुलून गेला होता.गावकऱ्यांनी आपापल्या घरासमोर रांगोळी फुलांचा सडा टाकला होता.हरिनामाच्या गजराने संपूर्ण गाव परिसर भक्तिमय झाले होते.
या प्रसंगी श्री क्षेत्र देवगड संस्थान चे मठाधिपती ह.भ.प गुरुवर्य भास्करगिरीजी महाराज,ह.भ.प कैलासगिरीजी महाराज, ह.भ.प अन्साराम महाराज मिसाळ, ह.भ.प बाळकृष्ण महाराज दिघे,ह.भ.प दादा महाराज वायसळ,ह.भ.प मारुती महाराज जाधव , या १०० व्या अखंड हरिनाम सप्ताह चे आयोजक तथा आमदार प्रशांत बंब यांची व्यासपीठावर प्रमुख उपस्थिती होती.
श्री क्षेत्र देवगडचे हभप गुरुवर्य भास्करगिरीजी महाराज म्हणाले की ,अमळनेर चा शताब्दी महोत्सव अखंड हरिनाम सप्ताह यशस्वी करून मुंदडा परिवार ,सप्ताह कमिटी आणि गावाने आपल्या चार गावाचे वैभव वाढविले नाही तर आपल्या धर्माचे,सांस्कृतिचे वैभव वाढविले. अशीच धर्मसेवा समाज सेवा आपल्या हातून अखंडपणे होवो. २६ डिसेंबर ते १ जानेवारी २०२४ या काळात सोलापूर जिल्ह्यातील तीर्थ क्षेत्र पंढरपूर येथे होणाऱ्या गोवत्स प. पूज्य भागवताचार्य राधाकृष्ण महाराज यांच्या रस महोत्सव च्या कार्यक्रमास जाण्या येण्यासाठी पन्नास एसटी बसची सोय गंगापूर सहकारी साखर कारखाण्याचे माजी संचालक रामेश्वर मुंदडा यांनी केली आहे.या ठिकाणी धार्मिक कार्यक्रमास जाणाऱ्या भाविकांनी आपली नोंद अमळनेरचे हभप नामदेव महाराज मिसाळ यांच्याकडे करावी व सर्वच भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन गुरुवर्य हभप भास्करगिरीजी महाराज यांनी केले आहे.

याप्रसंगी हितोपोदेश करतांना ह.भ.प शर्मा महाराज म्हणाले की,हा शतकोर अखंड हरिनाम सप्ताह छान यशस्वी केल्याबद्दल सप्ताहाचे आयोजक, आणि अमळनेर ग्रामस्थांचे मनापासून कौतुक करून सर्वांना धन्यवाद देतो. असे म्हणत गोकुळामधील भगवंत श्री कृष्णा च्या जीवनचरित्रचे विविध प्रसंग सांगत
काल्याच्या कीर्तनात दही हंडी फोडली.

या कीर्तनात सर्वात वयोवृद्ध असलेल्या जेष्ठ महिला गंगाबाई कन्हैयालालजी मुंदडा वय( 105) वर्ष या मातेचे पुष्पहार घालून पूजन मुलगा द्वारकादास मुंदडा,रामेश्वर मुंदडा व मुंदडा परिवाराने हजारो भाविकांच्या साक्षीने केले.

गंगापूर सहकारी साखर कारखान्याचे माजी संचालक रामेश्वर मुंदडा यांनी दिलेल्या महाप्रसादाने सप्ताहाची सांगता उत्साहात झाली.
यावेळी अमळनेर, गणेशवाडी, कायगाव, लखमापूर व पंचक्रोशीतील ग्रामस्थांनी साथ देऊन अथक परिश्रम घेऊन हा सप्ताह यशस्वी केला. यावेळी छत्रपती संभाजीनगर,अहमदनगर,बीड, परभणी, जालना आदी जिल्ह्यातील अंदाजे 30 हजार भाविकांनी या शताब्दी अखंड हरिनाम सांगता समारोप ला हजेरी लावून ज्ञानामृत व महाप्रसादाचा लाभ घेतला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!