गंगापूरच्या एस.टी. बस आयशरमध्ये अपघात एक गंभीर २५ किरकोळ जखमी..बाबरगांव फाट्याजवळील घटना आगाराचे अधिकारी निद्रिस्त

एस.टी. बस आयशरमध्ये अपघात एक गंभीर २५ किरकोळ जखमी..बाबरगांव फाट्याजवळील घटना आगाराचे अधिकारी निद्रिस्त अवस्थेत


गंगापूर(प्रतिनिधी)
गंगापूर भेंडाळा फाटा रस्त्यावर आज सायंकाळी मोटार सायकल स्वाराला वाचविण्याच्या नादात एस.टी. बस व आयशर ट्रकमध्ये समोरासमोर झालेल्या जोरदार धडकेत एस.टी. चालक गंभीर जखमी झाला असून एस.टी.मधील २५ प्रवासी किरकोळ जखमी झाले असून बस आगाराचे अधिकारी यांनी घटनास्थळी व जखमींना भेटण्याची साधी तस्दी घेतली नाही.

सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार गंगापूर आगाराची बस क्र एम.एच. २० बी.ई. ३८४६ छत्रपती संभाजीनगरकडे बाबरगाव फाट्यानजीक नांदुरमध्यमेश्वर कालव्याच्या पुलावरून सायंकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास जात असताना समोरून येणाऱ्या आयशर ट्रक क्र. एम.एच. ०४ जी.आर. ५८४७ यांची समोरासमोर धडक झाली या अपघातात ड्रायव्हरच्या केबीनचा चक्काचूर झाला असून ड्रायव्हरच्या पायाला जबर मार लागल्याने ते गंभीर जखमी झाले आहे.
या अपघातात एस.टी. बस चालक राजू खाडे यांचे दोन्ही पाय फ्रॅक्चर झाले तर वाहक राहुल रामनाथ बाराहातेसह बसमधील २५ प्रवाशी किरकोळ जखमी झाले आहे जखमींमध्ये रोहिदास तुपे बाबरगाव, सिध्दार्थ चव्हाण, रा. छ. संभाजीनगर, भास्कर मच्छिंद्र ताकवले, रा. सोलेगाव,आबासाहेब शेषराव उमाप रा सोलेगाव, अमोल भाउसाहेब गलांडे, गंगापूर, हिरालाल तुंगाडे अंबड, मनोहर पवार रा सोलेगाव, दामोधर पाटील, छ. संभाजीनगर, संजय कडुबा पवार छ. संभाजीनगर, किशोर गोपाळ आलेकर, म्हाडा कालनी गंगापूर, शिलावती रायभान खाजेकर,गंगापूर, संगीता जनार्धन शेजूळ कदीम शहापूर, कल्पना सोनवणे नायगाव, सुशीला राजू पटारे वाळूज, शेख आसमा इब्राहिम छ. संभाजीनगर, अश्मिरा शेख इब्राहिम छ. संभाजीनगर, आयशा सय्यद सलमान छ. संभाजीनगर, शेख आबेदा इब्राहिम छ. संभाजीनगर,, राहुल रामनाथ बाराहाते वाहक, म्हारोळा, दिपक मिलींद साळवे, छ. संभाजीनगर, आर.आर. डोबाळ, जोगेश्वरी, मनोहर माणिकराव पवार, सोलेगाव, प्रदीप शामराव दहिभाते तहसील कर्मचारी, छ. संभाजीनगर,, प्रियंका दिनेश काळे, वाळूज यांच्यासह एकूण २६ जणांचा समावेश आहे.

या सर्व जखमींना गंगापूर येथील सहा रुग्णवाहिकेमधून उपजिल्हा रुग्णालयात आणले असता उपजिल्हा रुग्णालयातील डॉक्टर मोहम्मद साजिद शेख,डॉ शहाना सैय्यद, डॉ राजेश गुडदे, डॉ नितीन वालतुरे, डॉ प्रशांत पंढुरे डॉ पानकडे, ब्रदर मुनीर शेख, परिचारिका शितल उदावंत,मंदा त्रिभुवन, मुन्ना भोसले, प्रफुल्ल गायकवाड, सागर शेजवळ यांनी सर्व जखमीवर उपचार केले *रुग्णालयात पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता* *काही जखमींना घरी पाठविण्यात आले तोपर्यंत बसचे अधिकारी फिरकले नव्हते यामुळे प्रवाशांनी नाराजी व्यक्त केली*.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!