लासुर स्टेशन येथे लोडशेडींगमुळे एखादी मोठी दुरघटना घडल्यास तसेच दोन दिवसात लोडशेडींग बंद न केल्यास महावितरण कार्यालय फोडणार असल्याचा इशारा शिवसेनेच्या वतीने देण्यात आला

लासुर स्टेशन येथे लोडशेडींगमुळ एखादी मोठी दुरघटना घडल्यास व दोन दिवसात लोडशेडींग बंद न केल्यास महावितरण कार्यालय फोडणार असल्याचा इशारा शिवसेनेच्या वतीने देण्यात आला

लासुर स्टेशन येथे लोडशेडींगमुळ एखादी मोठी दुरघटना घडल्यास व दोन दिवसात लोडशेडींग बंद न केल्यास महावितरण कार्यालय फोडणार असल्याचा इशारा शिवसेनेच्या वतीने देण्यात आला


गंगापूर (प्रतिनिधी)लासुर स्टेशन येथे गेल्या आठ दिवसापासून दररोज रात्री अपरात्री २-२ ते ३-३ तास चालू असलेली लोडशेडिंग दोन दिवसात बंद करा नसता शिवसेनेच्या वतीने कार्यालय फोडण्याचा इशारा माजी शहरप्रमुख नितीन कांजुने यांनी दिला आहे.
लासुर स्टेशन येथे गेल्या आठ दिवसापासून दररोज रात्री अपरात्री २-२ ते ३-३ तास लोडशेडींग होत असल्यामुळे येथील ग्रामस्थांना मोठा त्रास सहन करा लागत आहे यामुळे १९ ऑगस्ट रोजी लासुर महावितरण कार्यालय येथील सहाय्यक अभियंता आहेर यांची भेट घेऊन लोड शेडिंग थांबवावी अशी मागणी केली असता आहेर यांनी सांगितले की माझ्या अधिकारात लोडशेडिंग बाबद काही करता येणार नाही आपण वरिष्ठ कार्यालयाशी संपर्क करावा असे सांगितले त्यांनतर कांगुने यांनी संभाजीनगर येथील वरिष्ठ अधिकारी कार्यकारी अभियंता भूषण पहुरकर यांना दूरध्वनी वरून संपर्क करून सांगितले की लासुर स्टेशन येथे ८ दिवसापासून लोड शेडिंग होत आहे त्यामुळे चोरीच्या घटना घडू शकतात लोड शेडिंग मुळे गावात एखादी मोठी दुरघटना घडू शकते एखादी मोठी दुरघटना घडल्यास महावितरण कार्यालय फोडण्यात येईल व याची सर्वस्वी जबाबदारी तुमच्या कार्यलयाची राहील असा इशारा माजी शहरप्रमुख नितीन कांजुणे यांनी कार्यकारी अभियंता यांना दिला कार्यकारी अभियंता पहूरकर यांनी सांगितले की यानंतर लोड शेडिंग होणार नाही याची आम्ही परिपूर्ण जबाबदारी घेऊ यावेळी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादासजी दादा दानवे यांना दूरध्वनीवरून लोड शेडिंग बाबत कळविण्यात आले दानवे यांनी तत्काळ लोड शेडिंग थांबवा अशा सूचना महावितरणच्या अधिकाऱ्यांना दिल्या येत्या दोन दिवसात लोडशेडिंग न थांबवल्यास शिवसेनेच्या वतीने आंदोलन करण्यात येईल असा इशारा निवेदनात देण्यात आला आहे यावेळी शिवसेनेचे , युवासेना शहर प्रमुख योगेश मापारी, उपशहर प्रमुख प्रतीक खंडेलवाल, संदीप आमराव,युवासेना शहर समन्वयक अमन मुसळे, प्रतीक लिंगायत, अमोल काकडे, सनी बनकर, आकाश भगुरेसहआदींची उपस्थिती होती

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!