लोकप्रतिनिधींनी नागरिकांच्या, शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी काम करावे- आमदार प्रशांत बंब . हजरत मौलाना ख्वाजा मोइजोद्दीन दर्गा येथे ४१ लाख रुपयांचे निवासस्थानाचे उद्घाटन करण्यात आले


गंगापूर (प्रतिनिधी)
विकासात्मक काम करण्यासाठी नागरिकांनी एकत्रित येऊन साथ द्यावी, लोकप्रतिनिधींनी नागरिकांच्या, शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी काम करावे आपण सर्व मिळून जो पर्यंत एकजुटीने काम करणार नाही तो पर्यंत सर्वसमावेशक विकास शक्य नसल्याचे आमदार बंब म्हणाले. गंगापूर येथील ७५० वर्षांपासून अस्तित्वात असलेल्या हजरत मौलाना ख्वाजा मोइजोद्दीन यांच्या दर्गा गट नंबर १० येथे निवास बांधकाम करण्यासाठी आमदार प्रशांत बंब यांनी सार्वजनीक बांधकाम विभागांतर्गत तब्बल ४१ लाख ५५ हजार रुपयांचा निधी उपलब्ध करून देत कामाचे भूमिपूजन १ फेब्रुवारी रोजी केले त्यावेळी ते बोलत होते.
यावेळी व्यासपीठावर रामेश्वर मुंदडा, जिल्हा परिषद सदस्य मधुकर वालतुरे, मारुती खैरे, सभापती भाऊसाहेब पदार, नगर परिषदेच्या कार्यकारी अधिकारी डॉ. पल्लवी आंभोरे सार्वजनिक बांधकाम विभागाचे उप विभागीय अभियंता निरज विरवाडकर यांची उपस्थिती होती.
पुढे बोलताना ते म्हणाले की, नागरिकांनी केवळ लोकप्रतिनिधींच्या भेटींवर किंवा त्यांच्या येण्या जाणाऱ्यावर, लग्नाला हजेरी लावण्यावर लक्ष देऊ नका. तो लोकप्रतिनिधी काय काम करतो, कुठले हिताचे निर्णय घेतो, याकडे लक्ष देण्याचे सांगून आगामी काळात दोन लाख एकर शेती क्षेत्राला पाणी पोहवण्याचा संकल्प केला असल्याचे त्यांनी सांगितले.
दरम्यान यावेळी दर्गा कमिटीचे अध्यक्ष मोबीन जहागीरदार,
शाखा अभियंता काशीदवार, दीपक साळवे, राजू राठोड, रज्जाक पठाण, गोपाल वर्मा, मोबीन शेख, अशपाक शेख, ज्ञानेश्वर सवाई, रामेश्वर गवळी, आप्पासाहेब हिवाळे, जाफर शेख प्रशांत मुळे, रिजवान पठाण , उमेश बाराहते, भारत पाटील, अनिरुद्ध टेमकर, वैभव विधाते, संदीप बोजवरे, गोरख तुपलोंढे, योगेश चव्हाण, कृष्णकांत व्यवहारे, कल्याण गायकवाड, सूर्यकांत थोरात, उत्तम पदार, विक्रम राऊत, अरुण सागर, ज्ञानेश्वर यादव, अमर शेख नसीर शेख, चमन दादा, अलीम पटेल, अमोल शिंदे, संदीप आळंदकर, उमर जहागीरदार, अश्फाक जहागीरदार, शाकीर जहागीरदार, अमान जहागीरदार, सादिक जहागीरदार, जुनेद जहागीरदार, इमरान जहागीरदार, आयान जहागीरदार, वाजिद जहागीरदार, शोएब जाहीरदार, फिरोज जहागीरदार यांसह नागरिकांची उपस्थिती होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!