पत्रकार अलिम चाऊस यांच्या वाढदिवसानिमित्त जिल्हा रुग्णालयात फळ वाटप कार्यक्रम

गंगापर (प्रतिनिधी) शहरातील पत्रकार अलिम चाऊस यांच्या वाढदिवसानिमित्त गंगापूर उपजिल्हा रुग्णालयात डॉ. रमेश पवार व पत्रकारांच्या उपस्थितीत मंगळवारी ३० जानेवारी रोजी सकाळी गंगापूर उपजिल्हा रुग्णालय येथे रुग्णांना फळे वाटप करून ‘सेवा दिन’ म्हणून साजरा करण्यात आला.
अलिम चाऊस पत्रकार यांच्या वाढदिवसानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन केले होते. यावेळी डॉ. रमेश पवार, पत्रकार विजय बन्सोड, लालाखा पठाण, अतुल रासकर, हरुण पठाण, यांच्या प्रमुख उपस्थितीत उपजिल्हा रुग्णालय येथे रुग्णांना मोफत फळ वाटप करण्यात आले.
अलिम चाऊस यांच्या वाढदिवसानिमित्त यांनी
हॉस्पिटल संदर्भात व तेथील सेवा सुविधा याबाबत विस्तृत चर्चा करण्यात आली. उपजिल्हा रुग्णालयात सर्व सोयी सुविधा उपलब्ध करण्यासाठी शासन स्तरावर पाठपुरावा केला जाईल. जास्तीत जास्त रुग्णांना चांगली सेवा देता येईल या दृष्टिकोनातून सर्व पत्रकार बंधूंच्या माध्यमातून प्रयत्न करणार असल्याचे लालाखा पठाण यांनी सांगितले. उपजिल्हा रुग्णालयात सेवा सुविधा यांची उपलब्धता व रुग्णालयाची स्वच्छता अशा विविध विषयांवरती पत्रकार अलिम चाऊस यांनी चर्चा केली.
यावेळी जिल्हा राष्ट्रवादी नेते वाल्मिक शिरसाठ व ज्येष्ठ पत्रकार बाबुराव नरोडे, विजय बन्सोड, लालाखा पठाण,रमाकांत बन्सोड, अयुब पटेल, हरुण पठाण, इब्राहिम शेख, अतुल रसकार, शिवाप्रसाद बन्सोड, धनंजय ठोंबरे, अमर बाहशवान, लक्ष्मीकांत माघाडे, रमेश ठोंबरे, राजेंद्र जाधव, नदिम बागवान, बाळासाहेब वाघमारे, विशाल जोशी, दत्तात्रय जोशी, रशीद शहा, संतोष जोशी, सुभान शहा, राजू जाधव, साजिद तांबोळी, शिवप्रसाद केदारे,रामचंद्र बिरुदे, अमोल आळंजकर आदी पत्रकार उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!