शिवसेना ( उ. बा. ठा.) शिवगर्जना संपर्क मोहिमेला २ जुनला गंगापूर तालुक्यातून सुरुवात

शिवसेना ( उ. बा. ठा.) शिवगर्जना संपर्क मोहिमेस २ जुनला गंगापूर तालुक्यातून सुरुवात

विरोधी पक्षनेते अंबादास दानवे स्थानिक शिवसेना पदाधिकारी व शेतकऱ्यांशी साधणार संवाद

छत्रपती संभाजीनगर (प्रतिनिधी)

शिवसेना संभाजीनगर शाखेच्या वर्धापन दिनानिमित्त जिल्हाव्यापी शिवगर्जना…. “आता जिंकेपर्यंत लढायच” या संपर्क मोहिमेचे आयोजन करण्यात आले असून या मोहिमेअंतर्गत जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात सर्कल निहाय बैठकांचे आयोजन करण्यात आले असुन ०२ जून शुक्रवार रोजी या मोहिमेची गंगापुर तालुक्यातुन सुरुवात होणार आहे. यात सकाळी ९:३० वाजता वाळूज, ११:०० वाजता शेंदूरवादा, १२:३० वाजता जामगाव, ३:०० वाजता गंगापूर शहर या ठिकाणी बैठक होणार आहे.

या संपर्क मोहिमेत विरोधी पक्षनेते, जिल्हाप्रमुख अंबादास दानवे हे प्रमुख मार्गदर्शनाबरोबरच स्थानिक शेतकऱ्यांच्या प्रश्नांबाबत शेतकरी व पदाधिकारी यांच्याशी संवाद तसेच गंगापूर येथील वॉटर ग्रीड प्रकल्पास भेट, विविध विकास कामांविषयी तालुकास्तरीय अधिकारी यांच्या समवेत चर्चा व इयत्ता बारावी मध्ये विशेष प्राविण्यासह उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांची भेट घेणार आहेत. या व्यतिरिक्त त्या त्या विभागातील नागरिकांच्या भेटी घेऊन तेथील समस्यांची माहिती जाणुन घेणार आहे.
तसेच यावेळी महिला आघाडी जिल्हा संघटक प्रतिभा जगताप,युवासेना जिल्हा युवा अधिकारी मच्छिंद्र देवकर उपस्थितांना मार्गदर्शन करणार आहेत.

या मोहिमेत शिवसेना (उ.बा.ठा) उपतालुकाप्रमुख,शहरप्रमुख, विभागप्रमुख, उपविभागप्रमुख, शाखाप्रमुख, गटप्रमुख, महिला आघाडी, युवा सेनेचे पदाधिकारी, सर्व अंगीकृत संघटनेचे पदाधिकारी, आजी-माजी लोकप्रतिनिधी, आजी-माजी पंचायत समिती – ग्रामपंचायत – जिल्हा परिषद सदस्य यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन उपजिल्हाप्रमुख लक्ष्मण सांगळे,अविनाश पाटील, ,तालुकाप्रमुख दिनेश मुथा, महिला आघाडी उपजिल्हा संघटक लता पगारे, तालुका संघटक अर्चना सोमासे, शहरप्रमुख भाग्येश गंगावाल युवा सेना तालुका युवा अधिकारी ऋषी धाट यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!