साखर कारखान्यांनी ऊसाला प्रतीटन ४ हजार १०० रुपये भाव जाहीर करावा नसता टिपरु नेवू देणार नाही शेतकरी संघटनेचा इशारा


गंगापूर (प्रतिनिधी)उसाला कर्नाटक,गुजरात प्रमाणे ४ हजार १०० रुपये भाव जाहीर करून ऊस गळीतासाठी घेऊन जा नसता डिपरु नेवू देणार नाही शेतकरी संघटनेचा इशारा.
चालू वर्षी पाऊस कमी असल्याने उसाचे उत्पादन घटल्याने उसाचे पीक शेतकऱ्यांना परवडेनासे झाले आहे शेतकरी भावाच्या बाबतीत चिंतेत आहे.गंगापूर तालुक्यातील उसाला कर्नाटक,गुजरात प्रमाणे प्रतीटन ४१०० रु भाव पश्चिम महाराष्ट्र मधील ज्ञानेश्वर सहकारी,मुळा सहकारी,अगस्ती सहकारी,पियुष शुगर वांबोरी,युटेक,गंगामाई शेवगाव,भाऊसाहेब थोरात सहकारी संगमनेर,कुकडी सरकारी दौंड,साजन शुगर,संजीवनी सहकारी कोपरगाव,तसेच मराठवाड्यातील मुक्तेश्वर शुगर धमोरी,बारामती ऍग्रो कन्नड,नाथ सहकारी पैठण,शरद सहकारी विहामंडवा,गंगापूर सहकारी रघुनाथ नगर,स्वामी समर्थ महालगाव ह्या कारखान्याचे गळीत हंगाम सुरू झाले आहेत,काही सुरू व्होणार आहेत मात्र अजून एक ही कारखान्याने उसाचा भाव जाहीर न करता शेतकऱ्यांचे ऊस घेऊन जाण्याचा सपाटा लावला आहे.
शेतकऱ्यांना अंधारात ठेऊन कारखानदार शेतकऱ्यांची लूट करत आहे म्हणून गंगापूर तहसीलदार सतीश सोनी यांना ऊस उत्पादक शेतकरी संघटनेच्या वतीने निवेदन देऊन भाव जाहीर केल्याशिवाय उसाला तोडी लागू देऊ नये व भाव जाहीर करण्याची मागणी दिलेल्या निवेदनात करण्यात आली आहे यावेळी शेतकरी नेते भाऊसाहेब शेळके ,सुधीर माने ,जेष्ठ शेतकरी नेते कल्याण गायकवाड ,संपत रोडगे,विक्की भवार, विनोद काळे सह ऊस उत्पादक शेतकरी उपस्थित होते


प्रतिक्रिया:-
दुष्काळी परिस्थिती असल्याने उसाचे ॲव्हरेज कमी झाले असुन वजन घटले आहे.रासायनिक खते,लाईट,पाणी मशागत अत्यंत महाग झाली असून कित्तेक कारखाण्याने भाव जाहीर न केल्याने ऊस उत्पादक शेतकरी अडचणीत येण्याची शकता निर्माण झाली आहे जोपर्यंत कारखानदार चार हजार शंभर रुपये भाव जाहीर करत नाही तोपर्यंत उसाला कोयता लागू देणार नसल्याची भूमिका ऊस उत्पादक शेतकरी संघटनेची आहे.नसता तीव्र आंदोलन करून कारखानदार यांच्या गाड्या अडवण्यात येतील होणाऱ्या परिणामाला सरकार आणि कारखानदार जवाबदार असतील..
शेतकरी नेते भाऊसाहेब शेळके पाटील

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!