अखेर सामंजस्य करारावर शेतकऱ्यांच्या खोट्या सह्या करून फसवणूकीच्या गुन्ह्यातील फरार आरोपी कल्याण ऍग्रो फार्मर प्रोडूसर कंपनीच्या प्रताप साळुंकेला अटक . चार दिवस पोलिस कोठडी..


गंगापूर(प्रतिनिधी)सामंजस्य करारावर शेतकऱ्यांच्या खोट्या सह्या करून कल्याण ऍग्रो फार्मर प्रोडूसर कंपनी स्थापन करणा-या साळुंके यांच्या वर फसवणूकीच्या गुन्हा दाखल झाल्या पासून फरार आरोपी प्रताप साळुंकेला अटक करून येथील न्यायालयासमोर उभे केले असता चार दिवस पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश.

शेतकऱ्यांच्या सातबारा आधार कार्ड व इतर कागदपत्रांचा गैरवापर करून व त्यांच्या नावे खोट्या सह्या करून कृषी विभागाची व शेतकऱ्यांची फसवणूक करून कोट्यावधी रुपयांच्या अनुदानावर डल्ला मारणाऱ्या प्रताप साळुंके व शाम रावते याच्या विरोधात गंगापूर पोलीस ठाण्यात दुय्यम निबंधक यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला होता. २०१७ साली प्रताप वसंतराव साळुंके याने दर्जेदार कल्याण ऍग्रो फार्मर प्रोडूसर कंपनी या नावाने शेतकरी कंपनी काढली होती. सुरुवातीला या कंपनीत एकूण तीस सभासद असल्याचे खोटे पुरावे तयार करून सदर कंपनीला कृषी विभागाच्या वतीने शेती विषयक विविध विकास योजनांचे अनुदान लाटण्यासाठी १५/१२/२०१८ रोजी दुय्यम निबंधक कार्यालय गंगापूर येथे दस्त क्र.७१९५/२०१८ नुसार सामंजस्य करार नोंदणीकृत करण्यात आला होता.या करारासोबत एकूण तीस शेतकऱ्यांशी सामंजस्य करार झाल्याचे दाखऊन या वर नमूद केलेल्या शेतकऱ्यांच्या नावे बनावट व खोट्या सह्या करण्यात आल्या होत्या व या कराराच्या आधारे कृषी विभागाच्या नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजना,पोखरा,स्मार्ट प्रकल्प,आत्मा या वेगवेगळ्या विभागाकडे अर्ज करून कोट्यावधी रुपयांचे अनुदान प्रताप साळुंके याने परस्पर लाटले होते. याची कोणतीही माहिती करारात नमूद असलेल्या व कंपनीचे सभासद असलेल्या इतर सदस्यांना नव्हती मात्र शेतकऱ्यांनी माहिती अधिकार कायद्यांतर्गत ही सर्व माहिती काढून पाहणी केली तेव्हा हा प्रकार शेतकऱ्यांच्या निदर्शनास आला.
आपल्या नावाने दुय्यम निबंधक कार्यालय गंगापूर येथे करण्यात आलेल्या सामंजस्य करारावर प्रताप साळुंके यांनी खोट्या सह्या करून आमची फसवणूक केली अशी तक्रार शेतकरी कल्याण साळुंके व इतरांनी दुय्यम निबंधक गंगापूर तसेच वरिष्ठ कार्यालयाकडे केली होती.
या तक्रारीची चौकशी करून तसेच तक्रारदार यांचा जबाब नोंदवून करण्यात आलेला सामंजस्य करार व तक्रारदारांनी दिलेली तक्रार यामध्ये तफावत आढळल्याने दुय्यम निबंधक कार्यालयाच्या वतीने फिर्यादी सय्यद रसूल सय्यद अहमद सय्यद यांनी प्रताप साळुंके व शाम रावते यांच्या विरोधात गंगापूर पोलीस ठाण्यात अधिनियम १९०८ कलम ८२ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता तेव्हा पासून फरार असता सहाय्यक पोलीस निरीक्षक भागवत नागरगोजे यांनी प्रताप साळुंके याला ३ नोव्हेंबर रोजी सकाळी अकरा वाजता अटक करून येथील न्यायालयासमोर उभे केले असता न्यायालयाने त्याला सोमवार पर्यंत त्याला पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!