नेहरू माध्यमिक विद्यालय सावखेडा येथे स्नेह मिलन तब्बल १८ वर्षानंतर आले वर्गमित्र एकत्र.

गंगापूर (प्रतिनिधी)

गंगापूर तालुक्यातील नेहरू माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय सावखेडा येथील दहावी बारावी २००६-२००८ सालच्या वर्ग मित्रांचे स्नेह मिलन १० मार्च रोजी मोठ्या उत्साहात पार पडले.

यावेळी तब्बल अठरा वर्षे नंतर दीडशे माजी विद्यार्थी- विद्यार्थिनी व तत्कालीन शिक्षक एकत्र आल्याने जुन्या आठवणींना उजाळा देत भारावून गेले.

तत्कालीन शिक्षकांची वाजत गाजत मिरवणूक काढून गुरुपूजन करण्यात आले.
या कार्यक्रमासाठी प्रमुख अतिथी म्हणून दगडु पाटील मुळे यांच्या हस्ते दीपप्रजवलन करण्यात आले.तर तक्तालिन माजी शिक्षक लक्ष्मण मुळे, बी.एन.मुळे,प्रकाश वल्ले, अरुण मडके, पवार,व्यासपीठावर उपस्थित होते.
सध्याच्या युगात जो तो आपापल्या संसारात गुंतलेला असताना आपण जुन्या वर्गमित्रणी पुन्हा एकदा एकत्र येऊन शाळा भरावी असा संकल्प सोशल मीडियावर झाला.
सोशल मीडिया चां वापर करत सर्वांचे नंबर मिळवत एक ग्रुप तयार केला.
सर्व जण एकत्र येऊन आपला परिचय दिला.
संगीत खुर्ची,गायन, स्नेहभोजन असे कार्यक्रम पार पडले.
परत दरवर्षी असाच कार्यक्रमात एकत्र येऊ ह्या संकल्पनेने कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला.

कार्यक्रम पार पाडण्यासाठी अरुण तांगडे,ज्ञानेश्वर रोडगे,अनिरुद्ध मुळे,भागवत मुळे,पप्पू मानकरे ,अजय देवकर यांनी विशेष परिश्रम घेतले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!