आमदार प्रशांत बंब यांच्या हस्ते ५०४ कामगारांना संसार उपयोगी साहित्य वाटप


गंगापूर : (प्रतिनिधी )
जनतेचा पैसा शासनाकडे जमा असतो. तो फक्त जास्तीत जास्त पुन्हा जनतेपर्यंत कसा पोहचू शकेल हे काम जनतेने निवडून दिलेल्या लोकप्रतिनिधीचे असून त्या लोकप्रतिनिधींनी अंत्योदय म्हणजेच शेवटच्या गरिबातल्या गरीब माणसापर्यंत योजना पोहोचून त्यांचा आर्थिक सामाजिक विकास केला पाहिजे असे मत आमदार प्रशांत भाऊ यांनी व्यक्त केले.

ते लासुर स्टेशन येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत रविवार (दि.10 ) रोजी नवीन ५०४ नवीन व काही जुन्या नोंदणीकृत आणि बायोमेट्रिक झालेल्या कामगारांना संसार उपयोगी साहित्य वाटप करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती शेषराव जाधव, उपसभापती अनिल चव्हाण, बाजप तालुका अध्यक्ष रवींद्र चव्हाण, युवा मोर्चा जिल्हा अध्यक्ष अमोल जाधव, महिला मोर्चा तालुका अध्यक्ष शीला गाढे, सरपंच मीना पांडव, सुरेखा गायकवाड यांची उपस्थिती होती.
निवडणुका कुणाच्याही येऊ द्या आता जनतेने गावागावात फिरून योग्य नेता कोण योग्य गोष्टी कोणती केली पाहिजे कोणता नेता जनतेसाठी झटतो आहे त्यांच्यापर्यंत योजना पोहोचवत आहे आणि तो नेता तो लोकप्रतिनिधी जनतेसाठी घरदार सोडून काम करत असेल तर त्यांनी घराघरात जाऊन त्याच्या विषयी सांगितले पाहिजे. असे आवाहन देखील आमदार बंब यांनी उपस्थितांना केले.

दरम्यान यावेळी ५०४ नवीन व जुन्या नोंदणीकृत बायोमेट्रिक केलेल्या बांधकाम कामगारांना संसार उपयोगी साहित्य वाटप करण्यात आले. यावेळी कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक सुरेश जाधव, तालुका अध्यक्ष मनीष पोळ, विलास सोनवणे, अशोक जगताप, सुनील पाखरे, महेंद्र पांडे, ग्राम पंचायत सदस्य राजू गायकवाड, कल्याण पवार, अशोक सौदागर, गणेश व्यवहारे, विकी मढीकर, भगवान गाढे, संजय पांडव, अजय भिसे, चेतन मढीकर, अक्षय चव्हाण, रज्जाक पठाण ,कृष्णकांत व्यवाहारे,गोपाल वर्मा , अतुल रासकर, प्रशांत मुळे आदींची उपस्थिती होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!