वसंतराव नाईक तांडा सुधार समिती व यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजनेच्या जिल्हा अध्यक्षपदी राजेंद्र राठोड…

वसंतराव नाईक तांडा सुधार समिती व यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजनेच्या जिल्हा अध्यक्षपदी राजेंद्र राठोड…

गंगापूर (प्रतिनिधी) राज्य शासनाच्या वसंतराव नाईक तांडा सुधार समिती व यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजनेच्या जिल्हा अध्यक्षपदी राजेंद्र राठोड यांची महाराष्ट्र शासनाने नियुक्त केले.
गंगापूर शहरातील भारतीय जनता पक्षाचे माजी युवा जिल्हा उपाध्यक्ष युवक कार्यकर्ते राजेंद्र राठोड यांची राज्य सरकारच्या छत्रपती संभाजी नगर जिल्ह्याच्या वसंतराव नाईक तांडा सुधार समिती व यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजनेच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे सदरील निवड ही राज्याचे मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ,अजित पवार, तसेच बहुजन कल्याण मंत्री नामदार अतुल सावे ,केंद्रीय अर्थराज्यमंत्री डॉ भागवत कराड यांच्या संमतीने करण्यात आली आहे राजेंद्र राठोड हे गंगापूर शहरातील भारतीय जनता पक्षाचे धडाडीचे युवा कार्यकर्ते असून आमदार प्रशांत बंब यांचे खंदे समर्थक आहेत त्यांच्या निवडी मागे आमदार प्रशांत भाऊ बंब यांचा मोलाचा वाटा आहे या निवडीबद्दल भारतीय जनता पक्षाचे जिल्हाध्यक्ष संजय खंबायते ,किशोर धनायत, माजी नगरसेवक प्रदीप भैय्या पाटील, शहराध्यक्ष मारुती खैरे, दीपक साळवे तालुका अध्यक्ष शिवनाथ मालकर, माजी उपसभापती सुमित मुंदडा , ,रज्जाक पठाण ,गोपाल वर्मा ,रवी चव्हाण, कृष्णकांत व्यवाहारे, रुग्ण‌ कल्याण समिती सदस्य अतुल रासकर, प्रशांत मुळे ,राजेंद्र वाबळे ,महेश पाटील ,रामेश्वर पाटील , पप्पू पाटील ,तुषार राठोड, बाबासाहेब वराडे ,पा प्रदीप राजपूत, मनोज गायकवाड, अमोल साळवे , संजय अभंग, निवृत्ती अभंग ,योगेश पाटील ,शिवाजी पाहुणे, अनिल चव्हाण, सुदाम भडके, गणेश मनाळ, संचालक भारत पाटील, उमेश बाराहाते आदींनी निवडीबद्दल राठोड यांचे अभिनंदन केले .
येणाऱ्या काळात संपूर्ण छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यात वाडी तांड्यावर जाऊन वसंतराव नाईक तांडा वस्ती सुधार योजनेचा लाभ प्रत्येक घटकापर्यंत पोहोचवण्याचा मी प्रामाणिक प्रयत्न करेल:-राजेंद्र राठोड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!