गंगापूर येथील शेतकऱ्यांची जनावरे कत्तलीच्या नावाखाली ताब्यात घेऊन कारवाई करणाऱ्या पोलिसांवर कडक कारवाई करण्यात येवून २१ जनावरे परत करण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली.

गंगापूर (प्रतिनिधी) गंगापूर येथील शेतकऱ्यांच्या शेतातील जनावरांना कत्तलीच्या नावाखाली ताब्यात घेऊन खोटे गुन्हे दाखल करुन गावातील शांतता भंग करण्याचा प्रयत्न केल्याबद्दल गंगापूर पोलीसांच्याविरुद्ध कडून कारवाई करण्यात येवून शेतकऱ्यांची जनावरे परत करण्याची मागणी पोलिस महानिरीक्षक व पत्रकार परिषदेत शेतकऱ्यांनी केली.

गंगापूर शहरात चार दिवसांपूर्वी पोलिसांनी कत्तलीसाठी आणलेल्या ४४ गायींना ताब्यात घेउन केलेली कारवाई चुकीची असून त्यातील २१ गायी या शेतकऱ्यांच्या शेतातील असूनही पोलिसांनी खोटे गुन्हे दाखल केल्याचा आरोप करण्यात आला आहे.

   यासंदर्भात आज  ४ आक्टोंबर रोजी माजी नगराध्यक्ष मोहसीन चाउस यांच्या निवास्थानी पत्रकार परिषद घेण्यात आली त्यामध्ये पोलिसांनी कत्तलीच्या नावाखाली कारवाई करून जमा केलेल्या अनेक गायी व बैल हे शेतकऱ्यांच्या शेतात दुध व कामासाठी ठेवण्यात आल्याचा दावा करून त्या दिवशी अर्जदाऱांनी या जनावरांपैकी अनेक जनावरे हे आधारशी लिंक असल्याचे सांगण्याचा प्रयत्न करूनही पोलिसांनी काहीही न ऐकता बेकायदेशीरपणे जनावरे ताब्यात घेउन कारवाई केली असल्याचा दावा पत्रकार परिषदेत अर्जदारांनी केला.

यासंदर्भात उपस्थित असलेल्या अर्जदारांनी पोलिस महानिरिक्षक यांना निवेदन देण्यात आले असून या प्रकरणी चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे. यावेळीअर्जावर सही करणारे दादासाहेब अर्जून खरे, बब्बू हमद बागेस, खालीक जलाल कुरैशी, रफिक नुरअहेमद कुरैशी, शाहिद शरिफ कुरैशी यांच्यासह मोहसीन चाउस, माजी उपनगराध्यक्ष फैसल चाउस, सैय्यद हाशम .वाजेद कुरेशी यांच्यासह इतरांची उपस्थिती होती.

विशेष पोलीस महानिरीक्षक यांना दिलेल्या निवेदनात दादासाहेब अर्जुन खरे , बब्बु हमद बागेस, खालीक जलाल कुरेशी , रफिक नुरअहेमद कुरेशी, शाहिद शरीफ कुरेशी रा. गंगापुर यांनी निवेदनात सांगितले की आम्ही शेती करून कुटुंबाची उपजिविका भागवितो, शेतीच्या कामासाठी व दुधासाठी गाय व बैल आदी जनावरांचे पालनपोषण करतो.
३० आक्टोंबर रोजी गंगापुर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक व कर्मचारी यांनी व त्यांच्या सोबत आलेल्या पोलीस पथकाने बेकायदेशीर पणे अर्जदार व इतरांच्या घरात बळजबरीने प्रवेश करून घरात बेकायदेशीरपणे झडती घेवुन दमदाटी करून घरासमोरील जनावरे कत्तलीच्या नावाखाली बेकायदेशीरपणे जप्त केले त्याबाबत अर्जदार व इतरांनी संबंधीत पोलीस निरीक्षक व कर्मचारी यांना समजावुन सांगीतले की, सदर जनावरांपैकी काही जनावरांची आधार लिंक केलेली आहे. सदरची जनावरे हि आमच्या शेतात शेती कामासाठी व दुधासाठी ठेवलेली आहे. आम्ही शेतकरी आहोत आम्ही सदरची जनावरे कत्तलीसाठी ठेवलेली नाही सदरची जनावरे हि आमचे पाळीव जनावरे आहेत असे सांगुणही व त्याप्रमाणे विनंती करूनही संबंधीत पोलीस निरीक्षक व कर्मचारी यांनी कोणाचेही काही एक न ऐकता बेकायदेरशीपणे कार्यवाही केली.
जनावरे जप्त करून शनिवारचा आठवडी बाजार असल्याने मोठ्या प्रमाणात गर्दी असतांना पायी दिंडी काढली व गावातील वेगवेगळ्या रस्त्याने चौकातुन पायी घेवुन गेले संबंधीत पोलीस निरीक्षक व कर्मचारी यांनी बेकायदेशीर कार्यवाही करून खोटे गुन्हे दाखल केले व अर्जदार व इतर शेतकऱ्यांची जप्त केलेली जनावरे हि अर्जदारांच्या परवानगी शिवाय गौशाळेत पाठविण्यात आलेली आहे व एका प्रकारे अर्जदार व इतर शेतकऱ्यांवर अन्याय केलेला आहे. संबंधीत पोलीस निरीक्षक व कर्मचारी यांनी त्यांच्या पदाचा दुरूपयोग केलेला आहे आपण सत्य परीस्थितीचा विचार करून अर्जदार व इतर गंगापुर येथील शेतकऱ्यांच्या शेतातील जनावरांना कत्तलीच्या नावाखाली ताब्यात घेवुन खोटे गुन्हे दाखल करणाऱ्या व गावातील शांतता भंग करण्याचा प्रयत्न केल्याबाबत गंगापुर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक व कर्मचारी यांच्याविरुध्द कठोर कार्यवाही करण्यात यावी अशी मागणी निवेदनात केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!