कुटुंबातील सदस्यांप्रमाणेच कुत्र्यांचा दहावा घातला.

 
  1. गंगापूर (प्रतिनिधी) कुटुंबातील सदस्यांप्रमाणेच शिबा व शिजु या बहीण भाऊ असलेल्या कुत्र्यांचा दहावा श्री क्षेत्र रामेश्वर मंदिर येथे पाटील कुंटुबाने विधीवत पूजा करून घातला .
बजाजनगर येथील रवींद्र शामराव पाटील यांनी  सिंबा  कुत्रा त्याची बहीण शिजू यांना ७ ऑगस्ट २०२१ मध्ये घरी आणले होते.सिंबाचे १ मार्च  आणि शिजू त्याची बहीण ३ मार्च २०२४ रोजी दुर्दैवी निधन झाले. पावणे तीन वर्षे वयाच्या कुत्र्यांचा मृत्यू झाल्याने कुंटुबाने त्या बहीण भावंडांचा दहावा जुने कायगाव येथे रविवारी १० मार्च रोजी विधिवत पूजेनंतर करण्यात आले.
शिजूचा रस्ता अपघातात दुर्दैवी निधन झाले तल शिबाचा विषबाधा मुळे दुर्दैवी निधन झाले.पाटील परिवाराने आपल्या कुटुंबाच्या सदस्या प्रमाणे या बहीण भावंडांचा सांभाळ केला होता.त्यांच्या निधनाने त्यांच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.त्यांनी गंगा असलेली गोदावरी नदी काठच्या श्री रामेश्वर मंदिर सभागृहात दशक्रिया विधी वेदशास्त्र संपन्न दीपक जोशी यांच्या हस्ते केला.
रवींद्र पाटील,वंदना पाटील, माधुरी पाटील,तुषार पाटील,नरेश पाटील 
,तेजश्वरी पाटील,राजवी पाटील 
कायगाव टोका येथे आपल्या लाडक्या कुत्र्याची भूतदया , प्राणी मित्र 
कुटुंबापासून दूर गेल्याने 
दोघांचे दोन वाढदिवस साजरा करत होते.बजाजनगर येथून गाडी करून 
हिंदू धर्मानुसार त्यां दोघांचा अंत्यसंस्कार आडावत  ता.चोपडा जिल्हा जळगाव येथे केला होतो.त्यांचा जळगावला जन्म झाला होता.त्यांच्या स्मृतीत घरा समोर येणाऱ्या मुक्या प्राण्यांना पशु पक्ष्यांना अन्न धान्य,चपाती देणार असा संकल्प केला आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!