गंगापूर येथील अल्पवयीन मुलीवर शनिशिंगणापूर येथे अत्याचार करणाऱ्या दोन नराधमांची न्यायालयीन कोठडीत रवानगी


गंगापूर (प्रतिनिधी) गंगापूर येथील अल्पवयीन मुलीवर शनिशिंगणापूर येथे अत्याचार करणाऱ्या दोन नराधमांना गंगापूर पोलिसांनी सोनई व हनुमानवाडी येथुन अटक केली असून दोन्ही आरोपींची येथील न्यायालयाने हर्सूल जेलमध्ये रवानगी केली आहे.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार गंगापूर येथील अल्पवयीन मुलगी आईबरोबर नेहमी शिंगणापूर येथे येत होती. ती मुलगी घरी न आल्याने ११ जानेवारी रोजी हरवल्याची फिर्याद गंगापूर पोलिस ठाण्यात दाखल केली होती. तीन दिवसांपूर्वी अत्याचारीत मुलगी सोनई, नेवासेफाटा येथून आपल्या घरी गेली. तेव्हा तिने घडलेला प्रकार घरी सांगितल्यानंतर गंगापूर पोलिस स्टेशनमध्ये आनंद राजू मानमोडे (रा. हनुमानवाडी) व बालू जालिंदर शिंदे (रा. सोनई) यांच्या विरोधात अत्याचार व ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.
अत्याचारित मुलीचा जबाब झाल्यानंतर गंगापूरचे प्रभारी उपविभागीय पोलिस अधिकारी जयदत्त भवर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक सत्यजित ताईतवाले यांनी तपासाला वेग दिला. पोलिस उपनिरीक्षक ज्ञानेश्वर साखळे व पथकाने शिंगणापूर पोलिसांच्या मदतीने आनंद राजू मानमोडे (रा. हनुमानवाडी) व बालू जालिंदर शिंदे (रा. सोनई) या आरोपीस शिंगणापूर येथून अटक केली.
या घटनेतील आरोपी शिंगणापूरमधील पूजा साहित्य विक्रीशी संबंधित असल्याने शनिशिंगणापूर मध्ये होत असलेल्या गैरप्रकाराचा विषय ऐरणीवर आला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!