कायद्याचे व वरिष्ठांच्या आदेशाचे पालन न करणाऱ्या कनकोरीच्या ग्रामसेवक मनोज डोळसे यांच्याविरूध्द पोलीसात गुन्हा दाखल करण्याचे आदेश येथील न्यायालयाने दिले आहे.


गंगापुर (प्रतिनिधी) तालुक्यातील
ग्रामपंचायत कार्यालय कनकोरी येथील ग्रामसेवक मनोज डोळसे यांनी त्यांच्या वरीष्ठांच्या आदेशाचे व कायद्याचे पालन न केल्यामुळे गुन्हा दाखल करण्याचे आदेश येथील न्यायालयाने दिले आहे.
मनोज डोळसे यांनी त्यांच्या वरीष्ठांच्या आदेशाचे व कायद्याचे पालन न केल्यामुळे कोळघर येथील रहिवाशी दादासाहेब लक्ष्मण डोळस यांनी न्यायालयात न्याय मिळावा म्हणुन तक्रार दाखल केली होती.
या तक्रारीच्या अनुषंगाने गंगापुर येथील प्रथमश्रेणी न्यायाधिश एस वाय वाकचौरे यांनी तक्रारीची दखल घेवुन व तक्रारदाराने दाखल केलेल्या कागदपत्रांची पाहणी करून ग्रामसेवक मनोज डोळसे यांनी कायद्यानुसार तक्रारदारास नुकसान पोहचविण्याच्या हेतुने कायद्याचे पालन केले नसल्याचे व तसेच वरीष्ठांनी जारी केलेल्या आदेशाचे पालन केले नसल्याचे प्रथमदर्शनी न्यायालयास दिसुन आल्याने न्यायालयाने ३१/०८/२०२३ रोजी आदेश पारित करून कलम १६६ व १८८ भा. दं. वी. अन्वये ग्रामसेवक मनोज डोळसे यांच्याविरुद्ध ईशु प्रोसेसची ऑर्डर करून कार्यवाही सुरू केलेली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!