धक्कादायक .तुझे करिअर बनवतो’;माझ्यासोबत संबंध ठेव असे म्हणत सोळा वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार, पिंपरीतील क्रिएटिव्ह अकॅडमीच्या ५८ वर्षीय संचालक नौषादचा प्रताप.

पुणे (प्रतिनिधी) सोळा वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या पिंपरीतील क्रिएटिव्ह अकॅडमीचा संचालक आणि त्याला साथ देणाऱ्या एका तरुणीवर गुन्हा दाखल करण्यात आला असून दोघांना अटक करण्यात आली आहे.

तुझे करिअर बनवतो, तू माझ्यासोबत रिलेशनमध्ये रहा’ असं म्हणत क्रिएटिव्ह अकॅडमीच्या  नौशाद शेख याने दहावीतील विद्यार्थिनीवर दोन वर्षे लैंगिक अत्याचार केल्याचं समोर आलं आहे. हा धक्कादायक प्रकार पिंपरी- चिंचवड शहरात उघडकीस आला. याप्रकरणी क्रिएटिव्ह अकॅडमीचा संचालक नौशाद अहमद शेख (वय ५८) याच्यासह एका तरुणीला पोलिसांनी अटक केली आहे.
याप्रकरणी १६ वर्षीय पीडित मुलीच्या वडिलांनी तक्रार दिली. आरोपी नौशाद शेख हा पिंपरी- चिंचवडमध्ये क्रिएटिव्ह अकॅडमी या नावाखाली निवासी शाळा चालवतो महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांतून मुले आरोपीच्या निवासी शाळेत येतात. आरोपी ठिकठिकाणी जाऊन सेमिनारद्वारे मुलांना शिक्षणासाठी प्रोत्साहित करतो. दरम्यान २०२१ मध्ये शेख याने यवतमाळ मध्ये जाऊन अशाच प्रकारे सेमिनार घेतला होता. त्यानंतर पीडित मुलीच्या वडिलांनी तिचा नववी इयत्तेमध्ये निवासी शाळेत 2 लाख 26 हजार रुपये भरून प्रवेश घेतला होता.

आईवडील यांना खोटं सांगेन अशी धमकी देऊन केला अत्याचार.

२०२२ मध्ये नौषादने तो राहत असलेल्या फ्लॅटमध्ये पीडित मुलीला बोलावून घेतले. तेथे तिच्यावर अत्याचार करण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी मुलीने प्रतिकार करत स्वतःची सुटका केली. त्यानंतर आरोपी मुलीला जाणीवपूर्वक त्रास देऊ लागला. तुझ्या घरच्यांना फोन करून तुझे येथील मुलांबरोबर संबंध असल्याचे सांगेन असं सांगत तो धमकावू लागला. नोव्हेंबर २०२२ मध्ये देखील दिवाळीच्या सुट्टीमध्ये आरोपी शेख याने पीडित मुलीला तुला उटणे लावून अंघोळ घालून देतो, असं म्हणत तिचा विनयभंग केला. तसेच पुन्हा अत्याचार करण्याचा प्रयत्न केला. दरम्यान आरोपीने इतर मुलींसमोर पीडित मुलीबाबत अश्लील शेरेबाजी केली. त्यानंतर मुलीशी जबरदस्तीने शारीरिक संबंध प्रस्थापित केले. दुसऱ्या महीला आरोपीने पीडित मुलीला शेख याच्याबरोबर संबंध प्रस्थापित करण्यासाठी दबाव आणल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.

पिडीत मुलीने दोन वर्षे अत्याचार सहन केला

पीडित मुलीने सुमारे दोन वर्ष अत्याचार सहन केला. दोन वर्ष अत्याचार सहन केल्यानंतर मला यापुढे येथे शिकायचे नाही, मला घरी घेऊन चला, असे पीडित मुलीने पालकांना सांगितले. त्यानुसार पालकांनी मुलीला गावाकडे नेले. गावी गेल्यानंतरही मुलीने झालेल्या प्रकाराबाबत कोणालाही सांगितले नाही. ऑगस्ट २०२३ ते जानेवारी २०२४ कालावधीमध्ये मुलगी घरात कोणाशी बोलत नव्हती, कायम गप्प राहत होती. दरम्यान, मुलीने क्रिएटिव्ह अकॅडमीच्या काही माजी विद्यार्थिनींशी मोबाईलद्वारे संपर्क केला. त्यावेळी एका माजी विद्यार्थिनींनी, मी देखील अशाच काही प्रकारांना सामोरे गेली आहे. मात्र, त्यावेळेस मी हे कुणाला सांगितले नाही. तू तुझ्या आई-वडिलांना हा सर्व प्रकार सांग, जेणेकरून तुला न्याय मिळेल, त्यामुळे यापुढे अन्य कुठल्याही मुलीबरोबर असे घडणार नाही” असा सल्ला दिला. त्यावरून 11 जानेवारी २०२४ रोजी मुलीने रडत रडत तिच्यासोबत घडलेल्या सर्व प्रकारची माहिती आई वडिलांना दिली. या घटनेची माहिती मिळताच कुटुंब मोठ्या तणावात आले होते. या धक्क्यातून सावरल्यानंतर पालकांनी मुलीला घेऊन पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयात आणुन घडलेला प्रकार सांगितला तेव्हा पोलिसांनी देखील घटनेचे गांभीर्य लक्षात घेत आरोपींना बेड्या ठोकल्या.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!