डोक्यात गोळी मारुन शिल्लेगावच्या लघुउद्योजक तरुणाचा खून.कारण अद्याप गुलदस्त्यात. या कार्यकर्त्याची चार चाकी एक महिन्यापूर्वी जाळून टाकण्यात आली होती


गंगापूर (प्रतिनिधी) एका ३७ वर्षीय सामाजिक कार्यकर्ते तथा लघुउद्योजक तरुणाची अज्ञात हल्लेखोराने डोक्यात गोळी झाडून हत्या केली. सदरची घटनाऔद्योगिक वसाहतीतील साजापुर येथील क्रांतीनगरमध्ये रविवारी १७ मार्च रोजी सायंकाळी साडेसात वाजेच्या सुमारास घडली.
यापूर्वी या कार्यकर्त्याची चार चाकी जाळून टाकण्यात आली होती.

सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार शिल्लेगांव येथील तरुण उद्योजक सचिन साहेबराव नरोडे (३७) हे कुटुंबासह औद्योगिक वसाहत वाळूज येथील साजापुर मधील क्रांतीनगरमध्ये राहत आई, वडील, पत्नी व मुलासह राहतात १७ मार्च रोजी सायंकाळी साडेसात वाजेच्या सुमारास स्व:ताहाच्या घराच्या पाठीमागील रिकाम्या प्लाॅटवर उभे असताना अज्ञात व्यक्तीने जवळ येऊन कानाजवळ पिष्टलने गोळी झाडली ही गोळी डोक्यात आरपार गेल्याने सचीनचा जागेवरच मृत्यू झाला गोळीबारचा आवाज आल्याने आईवडील व पत्नी या आवाजाच्या दिशेने गेले असता त्यांना सचीन रक्ताच्या थारोळ्यात दिसल्याने आरडाओरडा केला व स्थानिक पोलिसांना बोलावले असता पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून गुन्हा नोंदविण्यात काम सुरू केले आहे. मृत तरुणाचा मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी छत्रपती संभाजीनगर येथील घाटी रुग्णालयात पाठवण्यात आला आहे. प्राथमिक तपासात तरुण उद्योजक याची हत्या कोणत्या कारणाने केली याचा अद्यापही तपास लागला नाही. या घटनेत गोळी लागल्याने पीडित व्यक्तीचा जागीच मृत्यू झाला होता.परंतु गोळीबार केला त्यावेळी दहा ते पंधरा मिनिटे लाईट गेलेली होती याचा फायदा घेतल्यानंतर मारेकरी तात्काळ घटनास्थळावरून पळून गेला.
गोळीबाराच्या घटनेमुळे साजापुर परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. यातील आरोपीचा शोध एम आय डी सी पोलिस घेत आहे घटनास्थळी संभाजीनगरचे पोलिस आयुक्त मनोज लोहिया, उपयुक्त नितीन बगाटे, गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संदिप गुरमे, वाळूज एमआयडीसी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक कृष्णचंद्रा शिंदे, उपनिरीक्षक संदीप शिंदे, प्रविण पाथरकर, अशोक इंगोले, यांचासह पोलीस कर्मचारी यांनी घटनास्थळी भेट दिली होती

वाळू तस्करीच्या तक्रारीतून हत्या झाल्याची जोरदार चर्चा

सचिन नरोडे हा सामाजिक कार्यकर्ता आणि लघुउद्योजक होता सचिनच्या लघुउद्योगामुळे अनेक महिलांच्या हाताला रोजगार मिळाला होता मात्र शिक्षकाचा मुलगा असल्यामुळे होणारा अन्याय डोळ्यांना पाहून सहन होत नाही म्हणून तो वाळू तस्करीच्या विरोधात तक्रारी करत होता कदाचित वाळू तस्करीच्या विरोधात तक्रारी केल्यामुळे सचिनची हत्या झाल्याची जोरदार चर्चा परिसरातील नागरिकांमध्ये होत आहे

यापूर्वीही सचिनवर हल्ला झाला होता

वाळू तस्करांच्या विरोधात सचिनने यापूर्वी तक्रारी केल्यामुळे सचिन वर हल्ला झाला होता यामध्ये सचिनची चार चाकी गाडी पूर्णपणे जाळून टाकण्यात आली होती त्यावेळी सचिन वाहनात नसल्यामुळे त्याचा जीव वाचला होता मात्र यावेळी हल्लेखोरांनी त्याच्या डोक्यात गोळ्या घातल्यामुळे तो जागीच गतप्राण झाला आहे एकूणच काय तर वाळू तस्करांमुळे त्याची हत्या झाल्याची चर्चा नागरिकांमध्ये होत आहे पोलीस प्रशासन या दृष्टीने तपास करून आरोपींना गजाआड करेल अशी अपेक्षा सर्वसामान्यांमधून व्यक्त केले जात आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!