अबब. चोर तो चोर वर शिरजोर गंगापूर तहसील कार्यालयाच्या आवारातुन जप्त केलेला हायवा वाळू ओतुन पळून नेला

गंगापूर (प्रतिनिधी) तहसील कार्यालयाच्या पथकाने पकडलेल्या अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या हायवाला तहसील कार्यालयाच्या आवारातुन मालक व चालकाने पळून घेवुन गेल्या प्रकरणी गंगापूर पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार शिवना नदीचे पात्रातून पथकाने पंचनामा करून अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या अशोक लेलैंड कंपनीचा, पिवळ्या रंगाचा, विना पासिंगचा, मिनी हायवा जुना वाहनावर दंडात्मक कार्यावाही करण्यासाठी तहसिल कार्यालय गंगापुर येथील आवारात १६ मार्च रोजी तिन वाजता आणुन उभे केले होते. वाहनाचे चालक संदिप गुरे राहणार शिरेगाव ता गंगापुर व मालक कार्तिक भुसारे रा देवळी ता गंगापुर व इतर ईसमांनी हायवा वाहनातील वाळु तहसिल कार्यालय आवारात ओतुन १६ मार्च रोजी पहाटे साडेतीन ते सकाळी सहा वाजेच्या सुमारास विना आदेशाने व दंडात्मक कार्यवाही न भरता चोरुन घेवुन गेल्या प्रकरणी तलाठी गणेश लोणे यांच्या फिर्यादीवरून कलम ३७९ ,१०९ भादवी व सहकलम २१,४, ख अधिनियम नियम १९५७ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस निरीक्षक सत्यजीत ताईतवाले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!