गोवंश चोरणारी आंतरजिल्हा टोळीच्या मो-हक्यासह स्थानिक गुन्हेशाखेने मुसक्या आवळल्या

गोवंश चोरणारी आंतरजिल्हा टोळीच्या मो-हक्यासह स्थानिक गुन्हेशाखेने मुसक्या आवळल्या


छत्रपती संभाजीनगर (प्रतिनिधी) जिल्हयात दरोडा टाकून बळीराजाचे गोवंश चोरी करणारी आंतरजिल्हा टोळी मो-हक्यासह स्थानिक गुन्हे शाखेने जेरबंद करुन १० लाख ३५ हजार रुपयाचा मुद्येमाल जप्त करण्यात आला आहे

पोलीस ठाणे एम.आय.डी.सी पैठण येथे योगेश श्रीधर नेमाणे यांनी फिर्याद दिली होती रात्री ३ वाजेच्या सुमारास कारकीन ता.पैठण येथे त्याचे राहते घरी पाच ते सहा अनोळखी इसमांनी फिर्यादीस चाकूचा धाक दाखवून लोट-लाट करुन फिर्यादीचे मालकीचे दोन बैल 40,000- रु.किमतीचे जबरीने चोरुन नेले होते .या प्रकरणी पो.स्टे एम.आय.डी.सी पैठण येथे कलम 395 भा.द.वि प्रमाणे गुन्हा दाखल होता पोलीस अधीक्षक मनीष कलावानिया, यांनी जिल्ह्यातून शेतक-यांचे वाढत्या जनावरे चोरीच्या घटनांची गांभीर्याने दखल घेवून वरील नमूद गुन्ह्यांचे समांतर तपास करण्याचे आदेश स्थानिक गुन्हे शाखा यांना दिले. ,स्था.गु.शाखेचे पोलीस निरीक्षक सतीष वाघ यांनी शेतक-यांची जनावरे ओढून चोरून नेणा-या टोळी बाबत माहिती घेत असतांना त्यांना गुप्त बातमीदारा मार्फत माहीती मिळाली की, शेतक-यांचे गोवंश पशुधन हे बळजबरीने रात्रीच्या अंधारात चोरुन नेणारी आंतरजिल्हा टोळी ही जिल्ह्यात सक्रिय आहे. तसेच या टोळीचा म्होरक्या शेख तय्यब शेख शफी रा.कुरेशी मोहल्ला अंमळनेर ता.अंमळनेर,जि.जळगाव ह.मू सावंगी ता.जि. छत्रपती संभाजीनगर हा रात्रीचे वेळी जनावरांची रेकी करून नंतर त्याचे साथीदारासह मिळुन बळजबरीने गोवंश जातीचे जनावरे वाहनात घालुन चोरून नेतो.
यावरुन स्थानिक गुन्हे शाखेचे एक पथक तयार करून पशुधन चोरणा-या टोळीच्या हालचाली सह त्यांचे पाळतीवर असतांना विजय जाधव, पोउपनि यांना गोपनीय माहिती मिळाली कि, पडेगाव परिसरात जनावरे चोरी करण्याचे उद्देशाने टोळी येणार आहे. यावरुन पोलीसांनचे दोन पथकांनी पडेगाव येथील हनुमान मंदीर परिसर व एम.एस.ई.बी. पॉवर हाऊस परिसरात रात्री एक वाजेच्या सुमारास सापळा लावला. यावेळी हनुमान मंदीराकडुन एक सिल्व्हर रंगाची स्कॉरपिओ व त्याचे सोबत दोन जण हे प्लसर मोटरसायकलवर भरधाव वेगात येतांना पथकाला दिसले. यावेळी दबाधरुन बसलेल्या पथकाने त्यांना थांबण्याचा ईशारा करताच त्यांनी पथकाला हुलकावणी देवुन अत्यंत वेगात दोन्ही वाहने ही पॉवरहाऊसच्या दिशेने पुढे निघाले यावरुन त्यांचेवर संशय बळावल्याने एम.एस.ई.बी. पॉवर हाऊस परिसरात सापळयातील दुस-या पथकांने अत्यंत शिताफिने रस्त्यावर वाहने आडवी लावुन दोन्ही वाहने ही थांबविण्याचा अटोकाट प्रयत्न करत असतांना पोलीस पाठलाग सोडत नाही असे लक्षात येताच त्यांनी त्यांची वाहने ही काही अंतरावर थांबवुन त्यांतील ५ लोक हे अंधाराचा फायद्या घेवुन बाजुला असलेल्या नागरी वस्तीतील अरूंद रस्त्यांचा सहारा घेवुन पळुन जाण्याचा प्रयत्नात असतांना पोलीसांनी त्यांचा जोरदार पाठलाग करत असतांना त्यांनी पोलीसांना तिव्र प्रतिकार करून पळुन जाण्याचा कसोशिने प्रयत्न करत होते तरीही पोलसांनी अत्यंत शिताफिने ५ ही संशयीतांना ताब्यात घेण्यात यशस्वी झाले त्याचे वाहनाची झडती घेतली असता त्यामध्ये चाकु, बॅटरी, जनावरे बांधण्यासाठी लागणारे दो-या असे साहित्य मिळुन आल्याने याबाबत त्यांना विचारपुस करता ते पोलीसांना उडवा-उडवीचे उत्तरे देवु लागल्याने त्यांचेवर अधिक संशय बळावल्याने त्यांना विश्वासात घेवुन कसोशिने विचारपुस केली असता त्यांनी आतापर्यंत जिल्हयातील वडोदबाजार(५),खुलताबाद(२), पैठण, एम एम आय डी सी.पैठण, चिकलठाणा, शिवुर, करमाड प्रत्येकी एक ठिकाणी असे एकुण १२ गुन्हे उघडकीस आले असुन या गुन्ह्यांत त्यांनी २५ गोवंश जातीचे जनावरे चोरी केली असल्याची कबुली दिली आहे . गोवशं जातीचे जनावरे चोरी करून त्यांची कत्तल करून त्यांचे मांसाची विक्री केली असल्याचे सांगितले असुन टोळी प्रमुख शेख तय्यब शेख शफी ४५ वर्षे रा. कुरेशी मोहल्ला अंमळनेर ता. अंमळनेर, जि.जळगाव, अरबाज अकबर पठाण २१ वर्षे रा. फार्मेसी कॉलेज जवळ, मालेगाव, जि. नाशिक ह.मु. सावंगी ता.जि. औरंगाबाद , अबुलास अहेमद अब्दुल हमीद अनसारी ३४ वर्षे रा. अन्सार नगर तिरंगाचौक, धुळे, ह.मु. सावंगी ता.जि. छत्रपती संभाजीनगर, सहेजाद शब्बीर अहमद २५ वर्षे रा. अख्तदाबाद मालेगाव, जि. नाशिक,ह.मु. सावंगी जि. छत्रपती संभाजीनगर असलम अहेमद कुरेशी २८ वर्षे रा. पडेगाव ता.जि. छत्रपती संभाजीनगर त्यांचे ताब्यातुन गोवंश जातीचे जनावरांचे मांसाची विक्रीतुन मिळालेली रक्कम रोख ४ लाख, ८५ हजार रुपये जप्त करण्यात आले असुन स्कॉरपिओ कार व प्लसर मोटरसायकल असा एकुण १० लाख ३५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक मनिष कलवानिया, अप्पर पोलीस अधीक्षक, सुनिल कृष्णा लांजेवार यांच्या मार्गदर्शनाखाली स्था.गु.शाखेचे पोलीस निरीक्षक सतिष वाघ,पो.उप.नि. विजय जाधव, पोलीस अंमलदार लहु थोटे, संजय घुगे, श्रीमंत भालेराव, नरेंद्र खंदारे,वाल्मिक निकम, गणेश सोनवणे, विजय धुमाळ, जनाबाई चव्हाण, कविता पवार, शेख अक्तर, योगश तरमाळे, जिवन घोलप यांनी केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!