जुगार अड्ड्यावर पोलिस अधीक्षकांच्या पथकाने छापा टाकला ११ जणांना ताब्यात घेतले. तर ३७ लाखांचा मुद्देमाल जप्त…

गंगापुर (प्रतिनिधी) गंगापूर शिवारातील शेतातील कांद्याच्या चाळीत सुरू असलेला जुगाराचा अड्डा पोलिसांनी केला उध्वस्त … अकरा आरोपींच्या ताब्यातुन ३६ लाख ८८, हजार ९३० रुपयांचा मुद्देमाल जप्त

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार पोलीस अधीक्षक, औरंगाबाद ग्रामीण मनिष कलवानिया, यांनी १६ मे रोजी गोपनीय बातमीदारा मार्फत गंगापुर हद्यीतील ज्ञानेश्वर यादव रा. श्रीकृष्णनगर, गंगापुर यांच्या शेतातील पत्र्याचे शेडमधील कांदयाचे चाळीमध्ये अवैधरित्या जुगार अड्डा चालु असल्याची माहिती मिळाली यावरून पोलीस अधीक्षक यांनी पोलीस अधीक्षक कार्यालयातील सहा.पोलीस निरीक्षक सुदाम सिरसाठ व देविदास वाघमोडे यांचेसह पथकाला तात्काळ मिळालेल्या माहितीच्या ठिकाणी खात्री करून छापा मारण्यासाठी पाठवले

पोलीस अधीक्षक यांचे सुचना व मार्गदर्शनुसार पो.अ. कार्यालय येथील छापा पथकाला वैजापुर येथुन अधिक पोलीसांचे एक पथक देवुन पोलीसांची वाढीव कुवक देण्यात आली. यावेळी पोलीसांनी वेगवेगळी पथके तयार करून श्रीकृष्णनगर, गंगापुर येथील ज्ञानेश्वर यादव यांचे शेताजवळ रात्री ८ वाजेच्या सुमारास सापळा लावला
सापळा पथकातील पोलीसांनी या संपुर्ण परिसराची बारकाईने व छुप्यापध्दतीने पाहणी व पडताळणी करून छापा मारण्याचे नियोजन केले. यानुसार पोलीसांचे पथकांनी रात्री ९ वाजेच्या सुमारास अंधारात मुख्य प्रवेश द्वाराचे गेट व संरक्षण भिंतीवरून उड्यामारुन शेतात प्रवेश केला. याठिकाणी लावण्यात आलेल्या काटेरी तारेचे फन्सिंगमुळे पोलीसांना आत प्रवेश करतांना तारेचे कट शरिरावर लागुन जखमा झाल्यात तरी पोलीसांनी जखमांचा विचार न करता अंधारात शेतात जावुन गेटपासुन काही अंतारवर लोखंडी जाळी असलेल्या पत्र्याचे शेडमधील कांद्याचे चाळीजवळ पोलीसांचे पथकाने लपत छपत जावुन पडताळणी केली असता तेथे १५ ईसम हे स्वत:चे आथिर्क फायद्यासाठी पत्यावर रुपये लावुन तिर्रट नावाचा जुगार खेळ खेळत व खेळवित असतांना दिसले यावरुन अचानक घेराव टाकुन छापा टाकला असता यातील ४ ईसम हे अंधाराचा फायदा घेवुन बाजुच्या शेताताने पळुन गेले, तर इतर तिर्रट जुगार खेळणा-या ११ ईसमाना ताब्यात घेतले यामध्ये
ज्ञानेश्वर यादव रा.श्रीकृष्णनगर,गंगापुर शिवाजी खैरे रा वळदगाव, पंढरपुर, चंद्रकांत गायकवाड रा. गंगापुर शुभम साळवे गंगापुर, मोहसीनअली अब्बास रजवी रा. औरंगाबाद , शफिक गुलाम रा.कन्नड प्रकाश खाजेकर रा.गंगापुर ,रमेश मोरे घोडगाव, गंगापुर संतोष काळे रा.गंगापुर हकिम शेख चाँद रा.गंगापुर , दिलीप पवार रा. गंगापुर असे मिळुन आले आहेत.
त्याचे ताब्यातुन ३ लाख ३६ हजार,२३० रुपये रोख तसेच ४ वाहने चारचाकी, ३ दुचाकी,१३ मोबाईल हॅन्डसेट , जुगाराचे साहित्य असा एकुण ३६ लाख,८८ हजार,९३० (छत्तीस लक्ष एैठयांशी हजार,नऊशे तीस रूपये मात्र) किंमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.
वरील आरोपीविरुध्द पोलीस ठाणे गंगापुर येथे महाराष्ट्र जुगार कायदा कलम 12 (अ) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला असुन पुढील तपास पोलीस स्टेशन चे प्रभारी सपोनी शाईनाथ गिते गंगापुर हे करित आहेत.

ही कार्यवाही मनिष कलवानिया, पोलीस अधीक्षक, सुनिल कृष्णा लांजेवार, अपर पोलीस अधीक्षक यांचे मार्गदर्शनाखाली सपोनि सुदाम सिरसाठ, देविदास वाघमोडे, पो.उप.नि. श्रीराम काळे पोलीस अंमलदार सुनिल शिराळे, जावेद शेख, संदिप आव्हाळे, विनोद जोनवाल, कल्याण खेडकर, आत्माराम पैठणकर, दिनेश गायकवाड, अमोल मोरे, योगेश कदम, गोपाल जोनवाल, अभिषेक डहाळे यांनी केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!