गंगापूर तहसीलदार यांचे फेसबुक अकाउंट हॅक; हॅकर करतोय पैशाची मागणी

नेटकऱ्यानो सावधान….. चक्क गंगापूरचे तहसीलदार सतीश सोनी यांचे फेसबुक केले हॅक, पोलिसांत तक्रार दाखल.

गंगापूर (प्रतिनिधी)
हॅकर तहसीलदारांच्या नावाने मित्रयादीतील लोकांना मागतोय पैसे, पोलिसांकडून अद्यापही कारवाई नाही बनावट फेसबुक खाते अद्यापही चालू …….

गंगापूरचे तहसीलदार यांचे फेसबुक अकाउंट हॅक झाल्याने आणि त्याद्वारे पैशाची मागणी होत असल्याने खळबळ उडाली आहे. गंगापूरचे तहसीलदार सतीश सोनी यांच्या अधिकृत या फेसबूक अकाउंटचे बनावट खाते तयार करून व त्यांचे फोटो टाकुन संबंधित व्यक्ती फेसबुक मित्रांकडून पैशाची मागणी करत आहे. संबंधित अकाउंट बनावट असून ब्लॉक करून मेसेज आल्यास नजीकच्या पोलिस स्थानकाशी संपर्क साधण्याचे आवाहन गंगापूरचे तहसीलदार सतीश सोनी यांच्यावतीने करण्यात आले आहे. यांचे वैयक्तिक फेसबुक अकाउंट काढण्यात आले आहे. अज्ञात व्यक्तीने सतीश सोनी या नावे बनावट अकाउंट तयार करून चारशे नागरिक,आधिकारी यांना फ्रेंड रिक्वेस्ट पाठवून त्यांच्याकडे पैशाची मागणी केली जात आहे.पैशाची आवश्यकता आहे. अशा आशयाचे मेसेज मेसेंजर द्वारे अज्ञात व्यक्ती पाठवत आहे. गेल्या दोन दिवसापासून त्यांच्या ओरिजनल फेसबुक अकाउंटवरून त्यांचे फोटो डाउनलोड करून फेसबुक हॅक करून बनावट फेसबुक खात्यावर फोटो डाउनलोड करून सतीश सोनी नावे बनावट असलेल्या अकाऊंटची फ्रेंड रिक्वेस्ट स्वीकारू नये, ज्यांना अशा अकाउंट वरून फ्रेंड रिक्वेस्ट पाठवुन मित्रयादीतील लोकांना पैसे मागवण्याचा गोरखधंदा हँकरणे चालू केला असला तरी तहसीलदार यांनी जागरूक होत तात्काळ पोलिसांत तक्रार दाखल करून बनावट फेसबुक खात्याची लिंक शेयर करत त्या खात्यावरून आलेल्या फ्रेंड रिक्वेस्ट स्वीकारू नये व कोणी ऑनलाईन पैश्याची मागणी करत असेल तर मुळीच पैश्याचा व्यवहार करू नये आपली फसवणूक होईल असे तहसीलदार सतीश सोनी यांनी व्हिडिओ द्वारे स्पष्ट केले आहे.या प्रकरणी अज्ञात हॅकर विरोधात पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे पुढील तपास पोलीस करत आहे .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!