पदभार स्वीकारण्याचा सतरा अधिका-याचा नकार…अखेर दुय्यम निबंधक कार्यालयाचा प्रभारी पदभार औदुंबर लाटे यांच्याकडे सोपवला.

पदभार स्वीकारण्याचा सतरा अधिका-याचा नकार…
अखेर दुय्यम निबंधक कार्यालयाचा प्रभारी पदभार औदुंबर लाटे यांच्याकडे सोपविण्यात आला.
गंगापूर (प्रतिनिधी) येथील दुय्यम निबंधकांच्या विरोधात कायम तक्रारीमुळे या जागेचा पदभाराला सतरा अधिका-यानी लेखीदेवुन नकाराल्याने अखेर दुय्यम निबंधक कार्यालयाचा प्रभारी पदभार औदुंबर लाटे यांच्याकडे सोपविण्यात आला.
गंगापूरचे दुय्यम निबंधक श्रेणी -१ चे प्रवीण माणिकचंद राठोड गंगापूर यांची महाराष्ट्र मुद्रांक अधिनियमाच्या कलम ६८ नुसार औरंगाबाद जिल्ह्यातील महानगरपालिका , सर्व नगरपालिका , स्थानिक स्वराज्य संस्था , महामंडळे , तसेच औरंगाबाद जिल्ह्यातील शासनाच्या नियंत्रणाखालील सर्व शासकीय निमशासकीय औ.बाद / आस्थापना १२ ९ १ संस्था / विभाग यांची तपासणी करण्यासाठी व तपासणी दरम्यान निदर्शनास आलेले यथोचीतपणे मुद्रांकित न केलेले संलेख महाराष्ट्र मुद्रांक अधिनियाच्या कलम ३३ नुसार अवरुद्ध करून चुकविलेला मुद्रांक शुल्क महाराष्ट्र मुद्रांक अधिनियमाच्या कलम ३ ९ नुसार दंडासह वसूल करण्यासाठी ही बाब शासनाच्या महसुलाशी संबंधित असल्याने तपासणी पथक प्रमुख म्हणून प्रवीण माणिकचंद राठोड , दुय्यम निबंधक श्रेणी -१ गंगापूर यांची पुढील आदेशापर्यंत नियुक्ती करण्यात आली होतीव प्रवीण राठोड यांच्याकडून गंगापूर या पदाचा पदभार सैय्यद रसूल यांचेकडे सुपुर्द करण्यात आला होता . परंतु सय्यद रसूल , वरिष्ठ लिपिक यांना दिलेल्या पदभारावर आक्षेप घेत कल्पनाताई गायकवाड राहणार रांजणगाव शें . पुं . ता . गंगापूर जि . औरंगाबाद यांनी दिनांक १८ मे २०२३ रोजी सकाळी ११ ते दुपारी ०२.०० वाजेपर्यंत पुंगी बजाओ आंदोलन करणार असल्याचे निवेदन १५ मे रोजी सह जिल्हा निबंधक वर्ग-1 या कार्लायास व
. यशवंत गोविंद शिरसाट यांच्या माध्यमातून दिनांक १५ मे रोजी सकाळी ११.०० पासून दुपारी वेळ २.00 पर्यंत अंदाजे 40 ते 50 महिलांसह आंदोलन करून सय्यद रसूल यांचे विरोधात त्यांच्या कार्यभार काढण्याबाबत घोषणा बाजी केली असल्याने लोकहिस्तास्तव सय्यद रसूल यांचेकडील दुय्यम निबंधक श्रेणी -१ गंगापूर या पदाचा पदभार दिनांक १५ मे रोजी मध्यान्होत्तर वेळेनुसार काढण्यात आला . व दुय्यम निबांधक श्रेणी -१ गंगापूर या पदाचा पदभार तात्पुरत्या स्वरुपात ए.सी.अंबीलढगे , वरिष्ठ लिपिक सह दुय्यम निबंधक वर्ग -२ सिल्लोड यांचेकडे देण्यात आला होता . परंतु ए.सी. अंबीलढगे यांनी सदर पद स्वीकारू शकत नाही असे सह जिओहया कार्यालयास विनंती अर्ज केला आहे . त्यानंतर सेवा जेष्ठते नुसार जिल्ह्यातील मुल्यांकन दुय्यम निबंधक तसेच सर्व वरिष्ठ लिपिक व क.लिपिक यांना दुय्यम निबंधक श्रेणी -१ गंगापूर यांना विचारणा करण्यात आली आहे परंतु या कार्यालयाच्या आस्थापनेवर पदभार स्वीकारण्यासाठी पात्र अधिकारी व कर्मचारी यांनी दुय्यम निबंधक श्रेणी -१ गंगापूर हे कार्यालय संवेदनशील कार्यालय असल्याने व त्या कार्यालयात तक्रारीचे प्रमाण प्रचंड असल्याने दुय्यम निबंधक श्रेणी -१ गंगापूर या पदाचा पदभार स्वीकारत नसल्याचे सतरा अधिकारी यांनी कळवले .त्यामुळे सह जिल्हा निबंधक वर्ग-1 औरंगाबाद यांनी शासनाची प्रशासकीय मान्यता घेवुन औदुंबर लाटे यांच्याकडे तात्पुरत्या स्वरूपात कार्यभार सुपूर्त केला आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!