कवडीमोल दरामुळे रस्त्यावर कांदे फेकून रास्तारोको आंदोलन..शेतकऱ्यांनी पाडले लिलाव बंद…

कवडीमोल दराने कांदा खरेदी करत असल्याने शेतकऱ्यांनी पाडले लिलाव बंद…
अर्धा तास गंगापुर वैजापूर महामार्ग बंद
गंगापूर(प्रतिनिधी) येथील कृषी उत्पन्न बाजार समिती मध्ये कांदा एक रूपया किलो दराने खरेदी होत असल्याने शेतकर्यांनी कांदा लिलाव बंद पाडुन गंगापूर वैजापूर रोडवर कांदा फेकून अर्धा तास रास्तारोको आंदोलन केले
कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कांदा व्यापा-यानी १६ मे रोजी एकाच आठवड्यात दुसऱ्यांदा कांदा एक रूपया खरेदी होत असल्याने संतप्त शेतकर्यांनी कांदा लिलाव बंद करून शेतकऱ्यांनी गंगापुर वैजापूर मार्ग रोखुन रस्त्यावर कांदा फेकत रास्ता रोको आंदोलन केले.
व्यापाऱ्यांनी संगनमत करून कांदा कमी दराने खरेदी करत असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला शेतकऱ्यांनी गंगापूर वैजापूर मार्ग अर्धा तास रोखून धरल्याने वाहतुकीचा काही काळ कोळंबा झाल्याने वाहनांच्या रांगा लागल्या होत्या.बाजार समितीमध्ये मोठ्या प्रमाणात गोंधळ उडाल्याने उपविभागीय पोलिस अधिकारी प्रकाश बेले,पोलीस निरीक्षक साईनाथ गीते,बाजार समितीचे मुख्य प्रशासन प्रशांत गावंडे,विजय हिवाळे, मनीष गजभिये यांनी मध्यस्थी करून तात्पुरत्या स्वरूपात कांदा खरेदी सुरू केला.

गंगापुर कृषी उत्पन्न बाजार समितीचा कांदा मार्केटमध्ये लिलाव दरम्यान कांदा उत्पादक शेतकऱ्यांचा अन्य बाजारपेठे पेक्षा सुमारे २०० ते ४०० रुपये प्रतिक्विंटल कमी दराने व्यापारी कांदा खरेदी करत होते.प्रचंड गोंधळामध्ये शेतकऱ्यांनी हा लिलाव बंद पडल्यानंतर काही काळासाठी गंगापूर वैजापूर रोडवर अचानक रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.संध्याकाळी ५ वाजता बाजारसमिती मध्ये पोलिस,व्यापारी,शेतकरी प्रतिनिधी, बाजार समितीचे कर्मचारी यांची बैठक होणार असुन कांद्याला चांगला भाव मिळत नसल्याने अविनाश अण्णासाहेब पाटील राहणार लक्ष्मी कॉलनी गंगापूर या शेतकऱ्यांने तिस क्विंटल कांदा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात फेकून दिला संदर्भात पुढील दिशा ठरवण्यात येणार आहे.

कृषि उत्पन्न बाजार समिती, गंगापुर यांनी काढली जाहिर सुचना

कांदा उत्पादक शेतकरी व व्यापारी बांधवांनी दिनांक १७/०५/२०२३ पासुन कांदा लिलाव पुढिल आदेश येईपर्यंत समितीच्या मुख्य बाजार आवार गंगापुर येथिल मोकळा व गोणी कांदा खरेदी विक्रीचे व्यवहार ( लिलाव ) बंद राहील. तरी पुढिल आदेश येईपर्यंत शेतकऱ्यांनी समितीमध्ये विक्रीसाठी कांदा घेऊन येऊनये

कांद्याला चांगला भाव मिळत नसल्याने अविनाश अण्णासाहेब पाटील राहणार लक्ष्मी कॉलनी गंगापूर या शेतकऱ्यांने तिस क्विंटल कांदा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात फेकून दिला

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!