जिल्हा परिषद सदस्य मधुकर वालतुरे यांच्या हस्ते मुद्देशवाडगांव येथे सतरा लाखाच्या कामाचे भूमिपूजन व वृध्दांना काठी वाटप

जिल्हा परिषद सदस्य मधुकर वालतुरे यांच्या हस्ते मुद्देशवाडगांव येथे सतरा लाखाच्या कामाचे भूमिपूजन व वृध्दांना काठी वाटप करण्यात आले
गंगापूर (प्रतिनिधी)जिल्हा परिषद सदस्य मधुकर वालतुरे यांच्या प्रयत्नातून मुद्देश वाडगाव येथे श्रीमद्वनाथ मंदिर परिसर संरक्षक भिंत ,अंगणवाडी बांधकामांचे भुमीपुजन व वृध्दांना काठी वाटप करण्यात आले
गंगापूर तालुक्यातील मुद्देश वाडगाव येथे जिल्हा परिषद सदस्य मधुकर वालतुरे यांच्या प्रयत्नातून श्रीमद्वनाथ मंदिर परिसर संरक्षक भिंत तीर्थक्षेत्र विकास निधीतून जिप अंतर्गत पाच लाख रुपये तसेच अंगणवाडी बांधकामासाठी अकरा लाख रुपये जि प अंतर्गत मंजूर करण्यात आले त्याचे भूमिपूजन जिप सदस्य मधुकर वालतुरे यांच्या हस्ते २० ऑगस्ट रोजी करण्यात आले यावेळी वयोवृद्ध नागरिकांना मधुकर वालतुरे यांच्यावतीने स्टील काठ्यांचे वाटप करण्यात आले.

यावेळी उद्धवराव तोगे, सुरेश दारुंटे, सरपंच योगेश तारू, नामदेव दारुंटे ,पुंडलिकराव दारुंटे , सतीश भडके, विश्वासराव बोरुडे, बाळू दारुंटे, हरिभाऊ घुले, संतोष भुसारे, शिरसाट मामा, मच्छिंद्र घुणे ,रावसाहेब भुसारे, निवृत्ती भुसारे, आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!