अवैध वाळू वाहतुक करणाऱ्यास दोन आरोपींना गंगापूर न्यायालयाने दिली शिक्षा !


गंगापुर (प्रतिनीधी)२०१२ साली खाम नदीपात्रातून चोरटी वाळू वाहतूक करणाऱ्या दोन आरोपींना गंगापूर प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी यांनी दोन वर्ष साधी शिक्षा व प्रत्येकी पाच हजार दंड ठोठावला आहे.

गंगापूर तालुक्यातील खाम नदीपात्रातून चोरटी वाळू वाहतूक करताना २०१२ साली दाखल झालेल्या खटल्याचा नुकताच निकाल आला.यामध्ये गंगापूर येथील प्रधान प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी एस.एस.अग्रवाल यांनी
आरोपी नारायन पुंजाराम चनघटे व नवनाथ ध्रुवबाळ जगदाळे रा.मेहंदीपुर ता. गंगापूर यास गंगापुर न्यायालयाने दोन वर्ष साधी शिक्षा व प्रत्येकी पाच हजार दंड व दंड न भरल्यास ०१ महिन्याची साधी शिक्षा करण्यात आली आहे.

वाळूज पोलिस स्टेशनचे पोलिस अंमलदार पोलीस उपनिरीक्षक मारोती शंकर आंधळे यांच्या कार्यकाळात खाम नदीपात्रातून अवैध वाळू उपसा करताना मेहंदीपुर येथील आरोपी नारायन पुंजाराम चनघटे व नवनाथ ध्रुवबाळ जगदाळे यास वाळूज पोलिसानी अटक केली.
यामध्ये ट्रॅक्टर एम. एच.२० ए.वाय.९६८७ ज्याला विना नंबरची ट्रॉली जोडलेली होती त्या ट्रॉलीमध्ये सात ब्रास वाळु ज्याचे मुल्य १४ हजार विना परवानगी तसेच रॉयल्टी शिवाय चोरटी वाहतुक खाम नदीतुन करीत असताना मेहंदीपुर येथे गावक-यांनी पकडले त्या अनुशंगाने तलाठी पांडुरंग ढाकने यांनी आरोपी विरूध्द पोलीस स्टेशन वाळुज येथे भा.द.वी. कलम ३७९ व गौन खनीज कायदा कलम २१ (भाग १ ते ५ ) नुसार गुन्हा दाखल केला होता.

या गुन्ह्यात एकूण आठ साक्षीदार तपासण्यात आले. ३० मार्च रोजी या गुन्ह्याचा निकाल गंगापुर न्यायालयाचे न्यायाधीश श्रीमत. एस.एस.अग्रवाल यांनी दिला.यामध्ये आरोपीस दोन वर्ष साधी शिक्षा व प्रत्येकी पाच हजार दंड व दंड न भरल्यास ०१ महिन्याची साधी शिक्षा सुनावली आहे.सुनावणी दरम्यान सहाय्यक सरकारी अभियोक्ता आनंद सज्जनदास वैष्णव यांनी भक्कम बाजू मांडली.पैरवी अधिकारी व्ही.जे.मडावी,पोलीस कॉन्स्टेबल प्रमोद कुलकणी,लिपीक टंकलेखक यांनी मदत केली.या गुन्ह्यामध्ये आरोपीस शिक्षा झाल्याने भविष्यात अवैध वाळू उपसा करणाऱ्यांवर नक्कीच चाप बसेल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!