रमजानमधील दुर्दैवी घटना.आग लागल्याने एकाच कुटुंबातील सात जनांचा गुदमरून मृत्यू यात दोन बालकांचा समावेश असुन घरमालक व पत्नी वाचले छावणी परीसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.


छत्रपती संभाजीनगरच्या (प्रतिनिधी) छावणी परिसरात टेलरिंगच्या दुकानाला भीषण आग लागल्याची घटना घडली. यामध्ये दुकानाच्या वरच्या मजल्यावर राहणाऱ्या ५ जणांचा गुदमरून तर २ जणांचा होरपळून मृत्यू झाला असून घरमालक व तिसऱ्या मजल्यावरील पती पत्नीचा जीव वाचला आहे.मृतांमध्ये तीन महिला आणि दोन मुलांचाही समावेश आहे.

३ एप्रिलच्या पहाटे ३ वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली आहे. हे टेलरिंगचे दुकान छावणी दाना बाजार गल्लीतील महावीर जैन मंदिरच्या बाजूला होते. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी अग्निशमन दलाने घटनास्थळी धाव घेतली. मात्र, तोपर्यंत सात जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला होता. मृतदेह शासकीय घाटी रुग्णालयात पाठवण्यात आले असून पोलिसांकडून पंचनामा केला जात आहे.
हमिदा बेगम अब्दुल अजीज (५०), शेख सोहेल अब्दुल अजीज (३५), रेश्मा शेख सोहेल शेख (२५), वसीम शेख अब्दुल आजीज (३०) तनवीर वशिम शेख (२३), असीम वसीम शेख (३) आणि परी वसीम शेख (२), अशी मृतांची नावे आहेत. हे सर्वजण एकाच कुटुंबातील आहेत. मृतामध्ये अब्दुल अजीम यांच्या कुटुंबातील त्यांची पत्नी दोन मुले दोन सुना आणि दोन नातू यांचा समावेश आहे.
चार्जिंग साठी लावलेल्या मोपेडमुळे लागली आग
छावणीतील दाना बाजार येथे घराला आग लागल्याची घटना ही शॉर्टसर्किटने झाल्याचे बोलले जात आहे घरमालक शेख असलम यांचे टेलरिंगचे दुकानातून त्यांनी त्यांची इलेक्ट्रिक मोपेड चार्जिंग साठी लावली होती, त्यामुळेच शॉर्टसर्किट झाल्याचे नागरिकांनी सांगितले. ही तीन मजली इमारत असून, ग्राउंड फ्लोअर ला शेख असलम यांचे किंग स्टाईल नावाचे टेलरिंग चे दुकान आहे पहिल्या मजल्यावर ते त्याची पत्नी व मुलासह राहतात
दुसरा आणि तिसऱ्या मजल्यावर त्यांनी भाडेकरू ठेवलेले आहेत दुसऱ्या मजल्यावर हमिदा बेगम अब्दुल अजीम यांचे कुटुंब तर तिसऱ्या मजल्यावर खुसरो व त्यांची पत्नी हे कुटुंब राहते शॉर्टसर्किटने आग लागल्याचे समजताच घरमालक शेख असलम व त्यांचे कुटुंब सुखरूप बाहेर पडले मात्र हमीदा बेगम अब्दुल अजीम यांच्या कुटुंबातील पाच जण श्वास गुदमरून तर दोघेजण होळपळून मरण पावले
वसीम शेख अब्दुल अजीम आणि शेख सोहेल अब्दुल अजीम हे छावणी बाजारातील म्हशीचे दूध काढून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवीत होते.

इमारतीतील सर्वात वरच्या भागात राहणारे खुसरो व त्यांची पत्नी यांनी शेजारच्या घराच्या गच्चीवर उड्या मारून स्वतःचा जीव वाचवला.,

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!