निवडणूकीच्या अनुषंगाने पोलीस अधीक्षक मनीष कलवानिया यांची गंगापूर येथील स्ट्राॅंगरुम व विविध मतदान केंद्रांना अचानक भेट देऊन सुचना दिल्या


गंगापूर (प्रतिनिधी) लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलीस अधीक्षक मनीष कलवानिया यांची गंगापूर येथील स्ट्राॅंगरुम व तालुक्यातील विविध मतदान केंद्रांना भेटी देऊन सुरक्षा विषयी महत्त्वाच्या सुचना अधिकारी व पोलिसांना दिल्या.


गंगापूर शहरातील श्री मुक्तानंद महाविद्यालयाच्या क्रीडा संकुलातील गंगापूर खुलताबाद मतदारसंघातील मतपेटी ठेवण्यासाठी बनविलेल्या स्ट्राॅंगरुमला अचानक भेट देऊन पाहणी केली व सुरक्षिततेसाठी उपाययोजना करण्याचे तहसीलदार सतीश सोनी, उपविभागीय पोलिस अधिकारी दिलीप भागवत,पोलिस निरीक्षक सत्यजीत ताईतवाले यांना सांगितले तसेच शहरातील व तालुक्यातील शिल्लेगाव पोलीस ठाणे हद्दीतील लासुर स्टेशन, सावंगी येथील विविध मतदान केंद्रावर लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचे ग्रामीण पोलीस अधीक्षक मनीष कलवानिया यांनी भेटी देऊन पाहणी केली यामध्ये कलवाणीया यांनी जिल्हा परिषद हायस्कूल गंगापूर व लासूर स्टेशन , सांवगी येथील जिल्हा परिषद हायस्कूल, कंचनबाई मुनोत कन्या विद्यालय लासुर स्टेशन येथील मतदान केंद्रावर जाऊन भेट देऊन मतदान केंद्राच्या व्यवस्थेची पाहणी केली व पोलीस अधिकाऱ्यांना विविध सूचना केल्या यावेळी गंगापूरचे उपविभागीय पोलिस अधिकारी दिलीप भागवत, पोलिस निरीक्षक सत्यजीत ताईतवाले, नायब तहसीलदार रामदास बोठे, खैरनार, संदीप वाडीकर, तलाठी गणेश लोणे शिल्लगावचे पोलीस निरीक्षक गोरख शेळके, बीड जमादार तात्यासाहेब बेंद्रे,डी.एस.बीचे, दादाराव तिडके मनोज आवटे,लासुर स्टेशनचे ग्रामविकास अधिकारी ज्ञानेश्वर मुकणे,संजय पांडव, कोतवाल प्रसाद दाभाडे,आदिसह पोलीस, महसूल कर्मचारी यांची उपस्थिती होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!