खळबळजनक ब्रेकिंग न्यूज अडीच वर्षांच्या बाळाला गोळी लागून गंभीर जखमी झाल्याने गंगापूर शहरात खळबळया घटनेमुळे पोलिसांच्या व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे.

खळबळजनक अडीच वर्षांच्या बाळाला गोळी लागून गंभीर जखमी झाल्याने गंगापूर शहरात खळबळ..
या घटनेमुळे पोलिसांच्या व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे.

गंगापूर (प्रतिनिधी) शहरातील अहील्यादेवी नगर मध्ये भाडेकरुच्या घरात गावठी कट्ट्यातुन दोन गोळ्या लागल्याने अडीच वर्षांचे बाळ गंभीर जखमी झाल्याने शहरात खळबळ उडाली आहे.या घटनेमुळे पोलिसांच्या व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे
सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार गंगापूर शहरातील अहील्यादेवी नगर मधील नवनाथ भराड यांच्या श्रमसाफल्य घरात भाड्याने राहत असलेला राहुल राठोड(३०) मुळ राहणार बीड हा इंडस बॅकेत काम करत असल्याची प्राथमिक माहिती असुन यांच्या घरात २५ ऑगस्ट रोजी सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास गावठी कट्ट्यातुन दोन गोळ्या झाडल्याचा आवाज आल्याने परीसरात खळबळ उडाली

या आवाजाने शेजारी पाजारी बाहेर आले तेव्हा राठोड व त्याच्या पत्नीने जखमी झालेल्या मुलाला घेऊन ताबडतोब दवाखान्यात गेला या घटनेची माहिती शहरात वा-यासारखी पसरल्याने घटनास्थळी बघ्यांनी मोठी गर्दी केली घटनास्थळी उपविभागीय अधिकारी प्रकाश बेले, पोलीस निरीक्षक सत्यजित ताईतवाले, पोलीस उपनिरीक्षक दिपक औटे, अमोल नांगरे, अभिजित डहाळे, यांनी भेट दिली व पाहणी केली असता किचन घरामध्ये गावठी कट्टा सापडला या कट्ट्यातुन दोन गोळ्या झाडल्या गेल्या मॅगझीन मध्ये तिन गोळ्या लोड केलेल्या होत्या यातील दोन गोळ्या झाडल्या गेल्या यात अडीच वर्षांचे बालक गंभीर जखमी झाले त्याला आई वडीलांनी छत्रपती संभाजीनगर येथे उपचारासाठी घेऊन गेले आहे . गंगापूर पोलिसांनी घटनास्थळावरून गावठी कट्टा एक जीवंत काडतुस व दोन पुंगळ्या जप्त केल्या या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.गंगापुर शहरात ‌अवैध धंदे बोकाळले असुन आतातर फायनान्स कंपनीमध्ये काम करणाऱ्या भाडेकरूच्या घरात गावठी कट्ट्यातुन गोळीबार झाला आहे बॅक वसुली अधिकारी यांच्या घरात कट्टा मिळाला तर शहरातील गुंड व अवैध धंदे करणा-याकडे तपासणी केल्यानंतर अनेक गावठी कट्टे निघतील असा प्रश्न उपस्थित केला जात आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!