नकोशीला तिसगाव चौफुली परिसरात टाकून अज्ञात महिला फरार, एमआयडीसी वाळूज पोलिसांनी वाचविले अर्भक (बाळाचे) प्राण

वाळूज (प्रतिनिधी)
तिसगाव चौफुली परिसरात एका स्री जातीच्या नकोशीला (अर्भक) अज्ञात महीलेने फेकल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. ही घटना बुधवार १८ आक्टोंबर रोजी सकाळी घडली असून एमआयडीसी वाळूज पोलीसांना माहीती मिळताच घटनास्थळी धाव घेऊन त्यांनी नकोशी (बाळाला) ताब्यात घेतल्याने या बाळाचे प्राण वाचले आहे.


तिसगाव चौफुली परिसरात मॉर्निंग वॉक करणाऱ्या तरुणांना
रस्त्याच्या कडेला अंधारात अर्भकाच्या रडण्याचा आवाज आला. तरुणांनी तात्काळ ही माहीती पोलीसांना दिली.यावर पोलीस उपनिरीक्षक संदीप शिंदे, प्रशांत सोनवणे यांनी घटनास्थळी धाव घेऊन बाळाला ताब्यात घेतले. त्यांनी नवजात अर्भकाला महीला अमलदार कविता साळुंके व जयश्री अर्दड यांच्या मदतीने उपचारार्थ घाटी दवाखान्यात दाखल केले. सुदैवाने हे बाळ सुखरुप असून त्याच्या आईचा शोध सुरू आहे. अनैतिक संबंधातून हे बाळ जन्मले, म्हणूनच त्याला मरण्यासाठी रस्त्यावर फेकून देत पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केला असावा. असा संशय व्यक्त करण्यात येत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!