अवैध गोवंश कत्तलखान्यांवर गंगापुर पोलीसांची धाड. ४४ गोवंशाची सुटका, गोमांस व साहित्यासह दोन आरोपी अटक

अवैध गोवंश कत्तलखान्यांवर गंगापुर पोलीसांची धाड. ४४ गोवंशाची सुटका, गोमांस व साहित्यासह दोन आरोपी अटक.


गंगापूर (प्रतिनिधी) स्थानिक पोलिसांनी शहरातील पोस्ट ऑफिस परीसरातील कुरेशी मोहल्ला येथे दोन कत्तलखान्यांवर छापा मारुन गोमांस व ४४ गायी वासरांची सुटका करून त्यांना गोशाळेत सोडले.


पोलीस अधीक्षक मनिष कलवानिया यांनी जिल्हयातील गोवंशाची चोरटी वाहतुकीस लगाम लावत गोवंश जनावरे टोळ्या हद्दपार केल्या असुन अवैधरित्या गोवंश कत्तलीच्या घटना अत्यंत गांभिर्याने घेऊन असे कृत्य करणारे ईसमांविरुद्ध सक्त व कठोर भुमिका घेऊन त्यांचे विरुद्ध तात्काळ गुन्हे दाखल करण्याचे निर्देश सर्व प्रभारी अधिकारी यांना देण्यात आलेले आहे.


यावरून गंगापूरचे पोलीस निरीक्षक सत्यजीत ताईतवाले यांना गोपनिय माहिती मिळताच शहरातील कुरेशी मोहल्ला या मध्यवस्तीमध्ये काही ईसम हे त्यांचे राहत्या वाड्यात कत्तलखाना चालवित असल्याचे तसेच कत्तलीकरीता आणलेली गोवंश जनावरे ही शेतात लपवुन ठेवत असल्याची माहिती मिळाली.
त्यावरून ३० सप्टेंबर रोजी पहाटे चार वाजण्याच्या सुमारास पोलीसांच्या पथकाने वेषांतर करुन अत्यंत सावधगिरीने कुरेशी मोहल्ल्यातील मध्यवस्तीच्या ठिकाणी असलेल्या सलीम ईस्माईल कुरेशी, जुबेर आयुब कुरेशी तसेच कलीम कुरेशी यांचे घराचे परिसरात सापळा लावला असता तेथे संशयित हालचाल दिसुन आल्यानंतर पोलीसांनी अत्यंत शिताफीने घराचे वाड्यात प्रवेश केला

तिथे समोरच्या पत्र्याच्या शेडमध्ये मोकळ्या वाड्यात गोवंशाची कत्तल झाल्याचे तसेच कत्तलीकरीता गोवंश बांधुन ठेवल्याचे दिसुन आले. पोलीसांनी पंचनामा करुन कत्तलीकरीता आणलेली १४ जिवंत गोवंश व एक मृत गोवंश जप्त केले व सलीम ईस्माईल कुरेशी, जुबेर आयुब कुरेशी यांना ताब्यात घेतले.त्यानंतर पोलीसांनी एवढ्यावरच न थांबता आसिफ युसुफ कुरेशी, बब्बु अहमद बागेत, मुनाफ कुरेशी, अफसर कुरेशी यांच्या गंगापुर परिसरातील शेतामध्ये छापे मारुन कत्तलीकरीता आणलेल्या गोवंशाची मुक्तता केली.या कारवाईत गंगापुर पोलीसांनी ४४ गोवंश जातीचे जनावरे,

गोवंश कत्तलीकरीता वापरण्यात येणारे साहीत्य सत्तुर, चाकु, कोयता, लाकडी ठोकळा तसेच 100 किलो वजन क्षमतेचा वजन काटा व गोवंश जनावरांच्या कत्तलीनंतर उरणारी चरबी यापासुन बनविलेला डालडा असे एकुण ८ लाख ८८ हजार रुपयाचे गोवंश व ईतर साहित्य जप्त करण्यात आले आहे. या प्रकरणातील आरोपीतांविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची पक्रिया सुरु असुन त्यांचेकडे एवढया मोठया प्रमाणावर गोवंश जातीचे जनावरे कसे आले आहेत याबाबत पुढील तपास गंगापुर पोलीस करीत आहे.


वरील कारवाई ही पोलीस अधीक्षक मनिष कलवानिया, अप्पर पोलीस अधीक्षक, सुनिल कृष्णा लांजेवार, उपविभागीय पोलीस अधिकारी प्रकाश बेले, यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सत्यजीत ताईतवाले, पोलीस उपनिरीक्षक दिपक औटे, पोलीस उपनिरीक्षक शकील शेख, पोलीस उपनिरीक्षक प्रमोद काळे, महिला पोलीस शेळके, पाटील ,धारकर,पोशि मनोज नवले, खाडे, सिंगल, चव्हाण, विजय नागरे, नागलोत, बाप्ते, सोनकांबळे, राहुल वडमारे, अमोल कांबळे, संदीप राठोड, गुसिंगे, अमोल देवकते यांनी केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!