ब्रेकिंग न्यूज गंगापूर येथे शौचास जाणाऱ्या महीलेला डोक्यात टोला मारुन गंभीर जखमी…बेशुध्द पडल्याने सोन्याचे दागिने लुटले.. महीला गंभीर..

ब्रेकिंग न्यूज शौचास जाणाऱ्या महीलेला डोक्यात टोला मारुन गंभीर जखमी…बेशुध्द पडल्याने सोन्याचे दागिने लुटले.. महीला गंभीर.. गंगापूर येथील घटना


गंगापूर (प्रतिनिधी) पहाटे शौचास जाणाऱ्या महिलेच्या डोक्यात दांडा मारुन गंभीर जखमी केले व गळ्यात व कानातील सोनं अज्ञात चोरट्यांनी लुटले. बेशुद्ध महीलेवर येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहे

सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार
गंगापूर शहरातील नवीन ईदगाह भागातील जाधव मळ्यात राहणाऱ्या लताबाई अनिल जाधव (४०) शनिवार ३० सप्टेंबर रोजी पहाटे चार ते पाच वाजेच्या सुमारास शौचास गेल्या असता दरोडेखोरांनी लताबाई यांच्या डोक्यात अज्ञात वस्तू मारुन गंभीर जखमी केले या मारहाणीत त्या रक्तबंबाळ होऊन बेशुद्ध पडल्या असता गळ्यात असलेले मनीमंगळसुत्र, कानातील सोन्याचे दागिने असा मुद्देमाल घेऊन पोबारा केला शौचालय गेलेली लता जाधव लवकर घरी न आल्याने पती अनिल जाधव यांनी शोध घेतला असता लताबाई जखमी व बेशुद्धावस्थेत आढळून आल्याने त्यांना तातडीने गंगापूर उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले त्यांच्यावर सध्या उपचार सुरू आहेत बातमी लिहिपर्यंत गुन्हा दाखल करण्यात आलेला नव्हता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!