गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या घोषणा देत जड अंतःकरणाने गणपती  बाप्पाला बालगोपालांनी दिला निरोप ..कायगांव टोका येथील गोदावरी नदीच्या पात्रात बाप्पांचे विसर्जन..

गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या घोषणा देत जड अंतःकरणाने गणपती बाप्पाला बालगोपालांनी दिला निरोप ..कायगांव टोका येथील गोदावरी नदीच्या पात्रात बाप्पांचे विसर्जन..


गंगापुर (प्रतिनिधी) आद्य पूजेचा मान असणा-या बाप्पांच्या आगमनाने संपूर्ण वातावरण भक्तीमय झाले होते. दररोजची आरती, सामाजिक, सांस्कृतिक कार्यक्रमांनी सर्वत्र एकीचे व सलोख्याचे नाते निर्माण झाले होते. असे हे वातावरण सर्वांनाच हवेहवेसे वाटत असताना अनंत चतुर्थीला गणरायाला भक्तांनी निरोप दिला. निरोपाच्या मिरवणुकीत उत्साह दिसून येत होता. पण प्रत्येकाचे अंतकरण मात्र गहिवरुन येताना बाप्पा… पुढच्या वर्षी लवकर या अशी आर्त हाक भाविक देत होते.

पहाटे तिन वाजेपर्यंत गणपती विसर्जन चालू होते.

दहा दिवस मुक्काम करुन गणपती बाप्पाला  निरोप देण्यासाठी औरंगाबाद जिल्ह्यासह अहमदनगर जिल्ह्यातील गणपती  गोदावरी नदीच्या कायगावटोका येथील श्री क्षेत्र रामेश्वर मंदिर परिसरात गणेश भक्ताची मोठी गर्दी केली होती या ठिकाणी छोटे गणपती जमा करून होडीने गोदावरी नदीच्या पात्रात नेवुन गणपती चे विसर्जन केले तर मोठ्या गणपतीचे विसर्जन क्रेनच्या साह्याने करण्यात आले . 

ढोल ताशांचा गजर गुलालाची उधलण व भावपूर्ण वातावरणात लाडक्या गणरायाला भक्तीभावाने निरोप दिला,गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर याच्या जयघोषाने  परिसर दुमदुमुन गेला होता.

दुपारी  रस्त्यावरील विविध गणेश मंडळाने  मिरवणूकीचे  सहभाग घेतला  ढोल ताशांच्या गजरात गुलालाने माखलेले चेहरे व ठेका धरून नाचनार्‍या  गणेश भक्तांनी मिरवणूकीत रंगत आणली,गंगापुर, कायगाव, भेंडाळा, जामगाव, मांजरीं, शिंगी, पिंपरी, छत्रपती संभाजीनगर, वाळुंज ,शे.राजणगाव ,तुर्काबाद   अहमदनगर जिल्ह्यातील नेवासा घोडेगाव खुपटी वडाळा या भागातील गणेश भक्तांनी सकाळी १० वाजेपासुन ‘श्री’ चे विसर्जन करण्यास सुरूवात केली.

पोलीस अधिक्षक मनीष कलवानिया, अप्पर पोलीस अधीक्षक सुनील लांजेवार उपविभागीय पोलिस अधिकारी प्रकाश बेले,पो.नि.सत्यजीत ताईतवाले यांच्या मार्गदर्शनाखाली ,भागवत नागरगोजे, पोलीस उपनिरीक्षक शकील शेख, दिपक औटे,राजेंद्र सावंत,अकील शेख , होमगार्ड समादेशक अधिकारी चंद्रशेखर पाटील, पोहेका अभिजित डहाळे, अमोल कांबळे, राहुल वडमारे, गणेश काथार, मनोज नवले, सुनील राठोड, सचिन काळे,एस ए पालवे,भागवत खाडे,लक्ष्मीकांत सपकाळ,रिजवान शेख, राहुल पगारे, विजय नागरे, संदीप राठोड, श्रीकांत बर्डे, दत्तात्रय अवधूत, थोरे यांनी श्री क्षेत्र रामेश्वर मंदिर परिसरात चोख बंदोबस्त ठेवला

बहुतांश विसर्जन मिरवणुकीमध्ये ठेक्यावर नाचणाऱया युवकांचा सहभाग कमी दिसून येत होता. पण त्याचबरोबर डॉल्बी बंदीतून पारंपरिक ढोल ताशांच्या गजराने आसमंत दुमदुमून गेल्याचे दिसून आले. या पारंपरिक वाद्यांमुळे मिरवणुकीतील अबाल वृद्धांसह महिलांचा सहभाग वाढला होता.

पोलिसांकडून बंदोबस्त

परिसरातील सार्वजनिक गणेशमूर्तीचे विसर्जन करण्यात आले. विसर्जन मिरवणुका शांततेत पार पाडण्यासाठी पोलीस प्रशासनाने ठिकठिकणी चोख पोलीस बंदोबस्त ठेवला होता. कायगावटोका येथील गोदावरी नदी येथे मूर्ती विसर्जन व निर्माल्य दान फलक लावून निर्माल्य संकलन तहसील कार्यालय यांनी  केले होते. निर्माल्य संकलन करण्यासाठी तहसीलदार सतीश सोनी, अप्पर तहसीलदार आकाश दहादडे,मंडळ अधिकारी बाळासाहेब जाधव, तलाठी सतिश क्षिरसागर, ज्ञानेश्वर नजन हे तळ ठोकुन होते. काही भाविकांनी आपल्या घरगुती गणेश मूर्तींचे विसर्जनही अनंत चतुर्थीच्या निमित्ताने केले.
अभूतपूर्व उत्साहात गणरायाला निरोप

ढोल-ताशांचा खणखणाट, रणहलगीचा कडकडाट, बँजोच्या संगीतावर थिरकणारी पावले, बँडवर वाजविण्यात येणारी जुनी मराठी, हिंदी गाणी, आकर्षक विद्युत रोषणाई, रंगीबेरंगी लेसर किरणांचा स्पेशल इफेक्ट आणि गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या च्या गजरात येथील सार्वजनिक तरुण मंडळाच्या गणरायांना निरोप देण्यात आला.

विसर्जन मिरवणुकीत दुपारी ५ वाजता प्रारंभ झाला. राजमुद्रा  ग्रुप पाठोपाठ मानाचा संस्थान गणपती मंडळ बँडच्या तालावर दाखल झाली.  जुनी हिंदी-मराठी गाणी वाजवून उपस्थितांची दाद घेतली. अनेक ग्रुपचे गणपती दाखल झाले होते. सायंकाळी ८ वाजता मिरवणूक मारुती चौक मार्गावर आल्यानंतर मानाच्या गणपतीचे स्वागत करण्यात आले तसेच मुस्लिम बांधवांनी पुष्पहार घालून गणपती बाप्पाचे दर्शन घेतले अंधार पडायला सुरुवात झाल्यानंतर विद्युत रोषणाईचा झगमगाट सुरू झाला. त्याचबरोबर मिरवणुकीला रंग चढू लागला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!