तालुक्यातील भाविकांनी भागवत कथा व किर्तन महोत्सवाचा मोठ्या संख्येने उपस्थित राहुन लाभ घ्यावा:- आमदार प्रशांत बंब..उद्यापासून अंमळनेर येथे भागवत कथा व अखंड हरिनाम सप्ताह शताब्दी महोत्सव…

तालुक्यातील भाविकांनी भागवत कथा व किर्तन महोत्सवाचा मोठ्या संख्येने उपस्थित राहुन लाभ घ्यावा:- आमदार प्रशांत बंब..
उद्यापासून अंमळनेर येथे भागवत कथा व अखंड हरिनाम सप्ताह शताब्दी महोत्सव…

गंगापूर (प्रतिनिधी)
गंगापूर तालुक्यातील कायगाव येथील अंमळनेर येथे आमदार प्रशांत बंब यांनी आयोजन केलेल्या अखंड हरिनाम सप्ताह शताब्दी महोत्सव… उद्या मंगळवार २९ ऑगस्ट पासून सुरुवात होत आहे
२९ ऑगस्ट ते ५ सप्टेंबरपर्यंत जोधपूर येथील गोवत्सल राधाकृष्ण महाराज यांच्या वाणीतून भागवत कथा ज्ञानयज्ञ व नामसंकीर्तन सोहळा प्रारंभ होत आहे. छत्रपती संभाजीनगर पुणे
महामार्गावरील नवीन कायगाव जवळील अंमळनेर येथे
सात दिवस चालणारा हा भव्य धार्मिक सोहळा सुरू होत असून यानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

त्यामध्ये दररोज दुपारी १ ते ५ वाजेदरम्यान राधाकृष्ण महाराज यांच्या मधुरवाणीमध्ये भागवत कथा होणार आहे. दि.२९ ऑगस्ट रोजी सायं. ७ ते ९ ह.भ.प. कैलासगिरी महाराजांचे कीर्तन, रोजी ३० ऑगस्ट रोजी ह.भ.प.स्वोमी प्रकाशानंदगिरी महाराज कीर्तन, ३१ ऑगस्ट रोजी ह.भ.प. विशाल महाराज खोले जळगाव यांचे कीर्तन, १ सप्टेंबर ह.भ.प. दादा महाराज वायसळ शास्त्री. यांचे कीर्तन, २ सप्टेंबरला ह.भ.प.आक्रूर महाराज साखरे यांचे कीर्तन, ३ सप्टेंबर रोजी प.पु.गोवत्स भागवताचार्य राधाकृष्ण महाराज, यांचे किर्तन ४ सप्टेंबर ह.भ.प.केशव महाराज उकळीकर यांचे कीर्तन, ५ सप्टेंबर रोजी ह.भ.प समाधान महाराज शर्मा यांचे काल्याचे कीर्तन व महाप्रसाद होणार आहे.

या धार्मिक कार्यक्रमाचा भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहुन लाभ घ्यावा, असे आवाहन आमदार. प्रशांत बंब, रामेश्वर मुंदडा, पंचायत समिती उपसभापती सुमित मुंदडा तसेच अंमळनेर ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!