लासुर कृउबा समितीवर भाजप आमदार बंब शिवसेना शिंदेंगटाने झेंडा रोवला तर कृष्णा पाटील डोणगावकर यांच्या तिस वर्षाच्या कारकिर्दीला सुंरुग


लासुर स्टेशन (प्रतिनिधी) गंगापूर तालुक्यातील लासूर स्टेशन येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या अटीतटीच्या निवडणुकीत आमदार प्रशांत बंब व आ. रमेश पाटील बोरनारे यांच्या भाजप शिवसेना शिंदे गटाच्या पॅनलने शिवसेना (उद्धव ठाकरे गट)चे उपजिल्हाप्रमुख कृष्णा पाटील डोणगावकर व राष्ट्रवादी काँग्रेस प्रणित पॅनलचा पार धुव्वा उडवला यामध्ये भाजप शिवसेना युतीच्या पॅनलचा 14 जागेवर दणदणीत विजय मिळवला तर कृष्णा पाटील डोणगावकर यांच्या पॅनलच्या दोन जागांवर समाधान मानावे लागले तर दोन अपक्षांनी बाजी मारली असून डोणगावकरांचा गेल्या पस्तीस वर्षांपासूनच्या सत्तेचा बुरुज ढासळला
लासुरस्टेशन येथील कृषी उत्पन्न बाजार समितीवर भाजप आमदार प्रशांत बंब व शिवसेना शिंदे गटाचे आमदार प्रा. रमेश बोरणारे सर यांनी १८ पैकी १४ जागांवर विजयी मिळवत बाजार समितीवर वर्चस्व प्रस्थापित केले असून राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना उध्दव गटाचे कृष्णा पाटील डोणगावकर यांच्या शिवशाही पॅनलचा अक्षरशः धुव्वा उडाला आहे. त्यांना सोसायटी मतदार संघातून दोनच जागा मिळत्या आल्या. तर काँग्रेसला एकही जागेवर विजय मिळवता आला नाही.

आमदार प्रशांत बंब व गंगापूर सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन कृष्णा पाटील डोणगावकर यांच्यासाठी ही निवडणूक अत्यंत प्रतिष्ठेची झाली होती यात आमदार प्रशांत बंब यांनी वैजापूर विधानसभा मतदार संघाचे आमदार रमेश बोरनारे यांच्या सोबत युती करून निवडणूक लढवली तर डोणगावकर यांनी राष्ट्रवादीसोबत युती करून ही निवडणूक लढवली ऐनवेळी माजी राज्यमंत्री अशोक पाटील डोणगावकर यांचे चिरंजीव तथा मध्यवर्ती बँकेचे संचालक किरण पाटील डोणगावकर यांनी निवडणुकीच्या रिंगणात त्यांच्या नेतृत्वाखाली पॅनल उतरवला होता यात त्यांना सपशेल अपयश आले.
भाजप- शिवसेना (शिंदे गट) यांचे १४ विजयी उमेदवार
सहकारी संस्था:- संभाजी जगताप, अशोक जगताप, मनीष पोळ, आप्पासाहेब जगदाळे, विलास सोनवणे, संजय केरे, संगीता चिंधे, ज्योती कुऱ्हाडे, शेषराव जाधव. ग्रामपंचायत मतदार संघ:- संतोष जाधव, रितेश मुनोत, अनिल चव्हाण, सुरेश जाधव. व्यापारी मतदारसंघ:- रतिलाल मुनोत, महेंद्र पांडे. हमाल मापारी:- सुनील पाखरे
शिवसेना (ठाकरे गट)- राष्ट्रवादी यांचे दोन विजयी उमेदवार सहकारी संस्था दिनेश मुथा नंदकुमार कुकलारे दोन अपक्ष उमेदवार विजयी व्यापारी मतदारसंघात प्रकाश मुथा व सुबोध मुथा यांनी अपक्ष असून विजयश्री खेचून आणली. दरम्यान यावेळी मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!