ईसारवाडी फाट्याजवळ दोन मोटारसायकलच्या अपघातात एक ठार एक गंभीर जखमी…

मोटारसायकलच्या अपघातात एक ठार एक गंभीर जखमी…
गंगापूर (प्रतिनिधी) ईसारवाडी फाटा बिडकीन रोडवर दोन मोटरसायकलचा समोरासमोर झालेल्या धडकेत एक ठार तर एक गंभीर जखमी झाला असून जखमीला उपचारासाठी छत्रपती संभाजीनगर येथे पाठविण्यात आले.

ईसारवाडी फाट्याजवळ ५ जुलै रोजी संध्याकाळी साडे आठच्या सुमारास दोन मोटारसायकलची समोरासमोर धडकेत दोन गंभीर जखमी झाल्याची माहिती मिळतात सागर शेजवळ शैलेश पवार यांनी घटनास्थळी धाव घेऊन दोन गंभीर जखमींना गंगापूर येथील उपजिल्हा रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी तपासून एकाला मृत घोषित केले असून मृतांचे नांव बाबासाहेब गीताराम इनामे वय ५० राहणार पान रांजणगाव ,बिडकिन असुन गंभीर जखमीवर प्रथमोपचार करून त्याला छत्रपती संभाजीनगर येथील घाटी रुग्णालयात पाठविण्यात आले

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!