पैठण पाचोड रोडवरील आखतवाडा पुलावर स्कार्पिओचा भीषण अपघात…..एक ठार ,पाच गंभीर….

पैठण पाचोड रोडवरील आखतवाडा पुलावर स्कार्पिओचा भीषण अपघातात…..
एक ठार ,पाच गंभीर….

पैठण प्रतिनिधी:- पैठण पाचोड रोडवरील आखतवाडा पुलावर बुधवारी दुपारी स्कार्पिओ पुलावर धडकल्याने झालेल्या भीषण अपघातात एकाचा जागीच मृत्यू झाला असून पाच जण गंभीर जखमी झाल्यामुळे जखमींना तातडीने छत्रपती संभाजीनगर येथील रुग्णालयात हलविण्यात आले आहे अपघातात मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव राहुल बापूराव केसभट रा.खेर्डा तांडा ता.पैठण असे आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार पैठण तालुक्यातील नानेगाव येथील सरपंच अनिल बोधणे वय २३ यांच्या स्कार्पियो क्रमांक एम एच २० जि के ८३३३ या वाहनातून बुधवारी ५ जुलै रोजी दुपारी चार वाजता पैठणकडे जात असताना आखतवाडा पुलावर अचानक पुलाच्या कठड्यावर धडक लागल्यामुळे रोडवरच स्कार्पिओ पलटी झाली या धडकेत स्कार्पिओ मधील श्रीराम कल्याण बोधणे वय २२, कैलास शंकर जाधव ( खेर्डा ग्रामपंचायत सदस्य ) बद्री नाहणू जाधव हे गंभीर जखमी झाले व राहुल बापूराव केसभट या तरुणाचा जागेवरच मृत्यू झाला. अपघातामध्ये जखमी झालेले सरपंच बोधणे सह शिवसेनेचे सक्रिय कार्यकर्ते असल्यामुळे रेणुकादेवी शरद कारखान्याचे चेअरमन विलास बापू भुमरे, शेखर शिंदे, किशोर चौधरी, स्वप्निल साळवे, दीपक मोरे, राजेंद्र मापारी यांनी तातडीने अपघात स्थळी जाऊन मदत करून जखमींना प्रथम पैठण येथील शासकीय रुग्णालयात हलविण्यात आले. परंतु जखमीची प्रकृती गंभीर असल्याने वरील जखमींना छत्रपती संभाजीनगर येथील रुग्णालयात पुढील उपचारासाठी पाठविण्यात आले आहे. या भीषण अपघातात स्कार्पिओचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होऊन सदरील वाहनाचा चक्काचूर झाला. या प्रकरणी पैठण पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली असून पुढील तपास पैठण पोलीस करीत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!