शिर्डी येथे देवदर्शनासाठी जाणा-या दोन भाविकांवर गंगापूर येथे काळाचा घाला. ट्रकने मोटारसायकला उडवल्याने दोन ठार एक गंभीर

शिर्डी येथे देवदर्शनासाठी जाणा-या दोन भाविकांवर काळाचा घाला. ट्रकने मोटारसायकला उडवल्याने दोन ठार एक गंभीर
गंगापूर (प्रतिनिधी) गंगापूर वैजापूर रोडवरील थोरात पेट्रोल पंपाजवळ ट्रकने मोटारसायकला जोरदार दिलेल्या धडकेत दोन ठार एक गंभीर जखमी झाला ही घटना आज पहाटे चार वाजता घडली
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार जालना जिल्ह्यातील विशाल रावसाहेब हिवाळे २४ ,, राहणार हातवन तालुका जिल्हा जालना, राजेश प्रताप पटेकर २३ राहणार मोतीगव्हान तालुका जिल्हा जालना, ज्ञानेश्वर सातपुते २४ राहणार कारला तालुका जिल्हा जालना हे मोटारसायकल क्रमांक एम एच २१ बि के ५०५८ वरून शिर्डी येथे साईबाबांच्या दर्शनासाठी जात असताना ४ जुलै रोजी पहाटे चार वाजता थोरात पेट्रोल पंपासमोर वैजापूरकडुन भरधाव येणाऱ्या ट्रक क्रमांक के ए- ५६ -५२७८ च्या चालकाने निष्काळजीपणे ट्रक चालवुन मोटारसायकल एम एच २१बि के ५०५८ ला जोरदार धडक दिली या धडकेत विशाल रावसाहेब हिवाळे,राजेश प्रताप पटेकर यांचा जागीच मृत्यू झाला तर ज्ञानेश्वर सातपुते हा गंभीर जखमी झाला याची माहिती मिळताच नागरिकांनी येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले असता दोघांना मृत घोषित केले तर सातपुते यांच्यावर प्रथमोपचार करून छत्रपती संभाजीनगर येथे पुढील उपचारासाठी पाठविण्यात आले या प्रकरणी गंगापूर पोलिस स्टेशनमध्ये रावसाहेब हिवाळे यांच्या फिर्यादीवरून ट्रक चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून चालक ट्रकसह फरार झाला आहे.पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक शकील शेख हे करत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!