दिवसा शेतात काम करणाऱ्या शेतकऱ्याचे घर फोडून रोख रक्कमेसह अडीच लाख रुपयांचे सोन्याचांदीचे दागिने घेऊन अज्ञात चोरटे पसार

दिवसा शेतात काम करणाऱ्या शेतकऱ्याचे घर फोडून रोख रक्कमेसह अडीच लाख रुपयांचे *सोन्याचांदीचे दागिने घेऊन अज्ञात चोरटे पसार*
गंगापूर (प्रतिनिधी) गंगापूर वैजापूर रोडवरील जखामाथवाडी येथे अज्ञात चोरट्यांनी काटकर वस्तीत दिवसा ढवळ्या घर फोडून ८० हजार रुपये रोख व सोन्याचांदीचे दागिने असा अंदाजे दोन ते अडीच लाखांचा ऐवज लंपास केल्याने शेतकऱ्यांनमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे
गंगापूर वैजापूर रोडवरील शहरालगत असलेल्या जाकमाथवाडी येथील आदित्य काटकर हे कुटुंबासह बाजूला असलेल्या त्यांच्या शेतात काम करत होते ते दुपारी तीन वाजता घरी जेवायला आलें असता त्यांचे घरांचा दरवाजा उघडला असता घरातील कपाट उघडून त्यात असलेले ८० हजार रुपये रोख व सोन्याचांदीचे १ लाख ७९ हजार रुपयांचे दागिने असा एकूण २ ते अडीच लाखाचा ऐवज अज्ञात चोरट्यांनी लंपास केला या घटनेमुळे परिसरातील शेतकऱ्यांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.
गंगापूर शहरांमध्ये दिवसेंदिवस चोरीच्या घटना वाढत असून या चोरट्यांचा लवकरात लवकर शोध घ्यावा अशी मागणी शेतकरी वर्गातून केली जात आहे.गंगापुर पोलिसांना चोरट्यांनी मोठे आव्हान दिले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!