माळीवाडगावला शेतवस्तीवर जबरी दरोडा रोख रक्कमेसह तेरा लाख रुपयांच्या सोन्याच्या दागिन्यावर मारला डल्ला…..

माळीवाडगावला शेतवस्तीवर जबरी दरोडा रोख रक्कमेसह तेरा लाख रुपयांच्या सोन्याच्या दागिन्यावर मारला डल्ला…..
.
गंगापूर(प्रतिनिधी) तालुक्यातील शिल्लेगाव पोलीस ठाणे हद्दीतील माळीवाडगाव येथे २९ मे सोमवारी पहाटे दोन ते चार वाजेच्या दरम्यान वळई नदीच्या शेजारी असलेल्या बाळू कडूबा गवळी यांच्या शेतवस्तीवर अज्ञात दरोडेखोराकडून जबरी दरोडा टाकला सहा लाख रुपये रोख व सात लाख रुपयांचे सोन्याचे दागिने असा एकूण तब्बल तेरा लाखाच्या मुद्देमालावर डल्ला मारला आहे.
सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार माळीवाडगाव येथे वळई नदीच्या शेजारी गट नंबर १५६ मध्ये गावातील प्रगतशील शेतकरी बाळू कडुबा गवळी यांची शेतवस्ती आहे याठिकाणी गवळी कुटुंबं राहते काल रात्री जेवण आटोपल्यानंतर उन्हाळा असल्याने घराला कुलूप लावून सगळे कुटुंबं अंगणात झोपी गेले होते साखरझोपेच्या वेळी म्हणजे पहाटे दोन तें चारच्या दरम्यान कुलूप तोडून दरोदेखोरांनी घरात प्रवेश केला व कपाट व पेटीत असलेले रोख सहा लाख रुपये व सात लाख रुपयांचे सोन्याचे दागिने घेऊन पोबारा केला गवळी यांच्याकडे हार्वेस्टर असल्याने त्यांनी हफ्ता भरण्यासाठी पैसे जमा करुण ठेवले होते चोरट्यानी त्यावरच डल्ला मारल्याने गवळी कुटुंबावर आर्थिक संकट कोसळले आहे अशी माहिती सरपंच विजय तुपे यांनी प्रतिनिधींशी बोलताना दिली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!