पैशासाठी ५५ वर्षीय महिलेचा गळा आवळून खून करणाऱ्या आरोपीला एका तासात जेरबंद केले

गंगापूर (प्रतिनिधी)

एका 55 वर्षीय महीलेला अर्थिक देवाणघेवाणच्या कारणावरुन गावातीलच एकाने  स्कार्फने  गळा आवळून खुन केल्याची घटना गंगापूर तालुक्यातील अगरकानडगांव येथील ममदापुर शिवारात गट नंबर 54  येथे 22 एप्रील रोजी रात्री आठ वाजेच्या सुमारास घडली 23 एप्रील रोजी सकाळी ही घटना ऊघडकीस अली असून अवघ्या एका तासातच मारेकरी सोमनाथ म्हसारे याच्या गंगापूर पोलिसांनी मुसक्या आवळल्या. पोलीसाकडून मिळालेल्या माहितीनुसार गंगापूर तालुक्यातील अगर कानडगाव येथील  अलकाबाई शेषराव सोलाट वय 55 वर्ष या महीलेने सोमनाथ ज्ञानेश्वर म्हसारे वय 27 वर्ष याच्याकडून दिडवर्षापुर्वी ट्रॅक्टरचा हप्ता भरण्यासाठी सव्वा लाख रुपये ऊसने घेतले होते दिलेले सव्वा  लाख रुपये   मृत अलकाबाई कडे  म्हसारे याने   अनेक वेळा मागणी करून तगादा लावला होता पैशाच्या वादातून या दोघामधे अनेक वेळा खटके ऊडाले 22 एप्रिल रोजी रात्री  7;00 वाजेच्या, सुमारास मृत अल्का आणि म्हसारे यांच्या दोघामधे कडाक्याचे भांडण झाले यानंतर मृत अल्का जवळच असलेल्या ममदापुर शिवारातील शेत गट नंबर 54 मध्ये शौचास गेली असता अरोपी सोमनाथ म्हसारे हा देखील अल्काच्या पाठीमागे गेला म्हसारे याने अल्का हीचा स्कार्फ ने गळा आवळून खुन केला अरोपीने तेथून पळ काढला बऱ्याच वेळ अल्का परत न आल्याने नातेवाईकांनी शोध घेतला परंतु याचा काही थांगपत्ता लागला नाही 23 एप्रिल रोजी सकाळी फिर्यादीचा मावसभाऊ लघुशंका करण्यासाठी बाजूला असलेल्या शेतात गेला असता अल्काबाईचा मृतदेह आढळला याची माहिती पोलिस पाटील दंडे यांना दिली असता त्याने गंगापूर पोलीसांना घटनेची माहिती दिली असता घटनास्थळी ऊपविभागीय पोलीस आधिकारी प्रकाश बेले, प्रभारी सहा पोलीस निरीक्षक साईनाथ गिते, ऊपनिरीक्षक दिपक औटे, पोलीस हेड काँन्सटेबल विजय भिल्ल, बलविर बहुरे, अभिजित डहाळे, ज्ञानेश्वर चव्हाण, विजय नागरे, कैलास निंभोरकर, पदम जाधव आदींनी घटनास्थळी धाव घेत पाहणी करून पंचनामा केला यानंतर अमलदार बलविर बहुरे यांना खब-याने माहिती दिली कि गावातील सोमनाथ म्हसारे यानेच सदर महीलेचा खुन केला म्हसारे यास बहुरे व विजय भिल्ल यांनी विश्वासात घेऊन विचारपूस केली असता त्यानें खुनाची कबुली दिली त्यामुळे एका तासातच अरोपी सोमनाथच्या मुसक्या आवळण्यात पोलीसांना यश आले आहे अल्काबाईचा मृतदेह श्ववविच्छेदन करण्यासाठी गंगापूर येथील ऊपजिल्हा रुग्णालयात आणला असता  डॉ गितेश चावडा यांनी मृत घोषित करून श्ववविच्छेदन केले या प्रकरणी मृत अल्काबाईचा मुलगा लक्ष्मण सोलाट याच्या फिर्यादीवरून गंगापूर पोलीस ठाण्यात  खुन केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे पुढील तपास सपोनि अशोक चौरे हे करत आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!